राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे दोन ठिकाणी तर श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवणी येथील गावठी दारू अड्ड्यावर राज्य...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे दोन ठिकाणी तर श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवणी येथील गावठी दारू अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापे टाकून १ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट केला आहे.
श्रीराम नवमी निमित्ताच्या श्रीरामपूर येथील यात्रेच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या गुप्त बातमीनुसार १३ एप्रिल रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने श्रीरामपूर शहरातील गोंधवणी व राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील दोन ठिकाणी अचानक छापे टाकून हातभट्टी बनविण्याचे अड्डे उध्वस्त करून हातभट्टी तयार करण्याचे ६ हजार २९० लिटर कच्चे रसायन ६,२९० व तयार हातभट्टी गावठी दारू २३३ लिटर असा एकूण १,८६,३००/- चा मुद्देमाल जागीच नाश करण्यात आला असून अज्ञात इसमांविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (ई), (फ) अन्वये कारवाई करून एकूण ५ गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत.
सदरील कारवाई प्रसाद सुर्वे विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग पुणे, गणेश पाटील अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर, नितेश शेंडे उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोळपेवाडी आसवानी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. गोपाल चांदेकर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी केली.
या कारवाईत दुय्यम निरीक्षक पी. बी. अहिरराव, ए. जे. यादव, . ए. न. सी. परते, के. यु. छत्रे, डी. वाय. गोलेकर, एम. डी. कोंडे, व्ही. एम. बारवकर. सहाय्यक दुय्यम निरीक्षक के. के. शेख, एस. एस. गारळे, टी. बी. करंजुले, आर. बी. कदम, एन. ए. ठुबे जवान पी. डी. साळवे, बी. के. नागरे, सी. बी. पाटोळे ,महिला जवान श्रीमती. एस. आर. फटांगरे, श्रीमती. व्ही. एस. जाध वाहन चालक व्ही. आर. कर्पे, एस. एम. कासुळे आदी सहभागी झाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत