राहुरी(प्रतिनिधी) गावातील लोकसंख्येच्या प्रमाणात ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी अनुदान मिळणार असल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे या...
राहुरी(प्रतिनिधी)
गावातील लोकसंख्येच्या प्रमाणात ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी अनुदान मिळणार असल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली राहुरी नगर पाथर्डी या विधानसभा मतदारसंघात अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या हक्काच्या मालकीच्या इमारती नाही त्याकरिता ग्राम विकास विभागाकडून लोकसंख्येच्या आधारित ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी अनुदान निधी मंजूर करण्यात आलेला आहे मतदार संघातील सहा गावांना निधी मंजूर झाला असल्याचे मंत्री तनपुरे यांनी स्पष्ट केले अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, राज्याचे ग्रामविकास विभाग अंतर्गत बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत इमारत बांधणी योजनेंर्गत राहुरी विधानसभा मतदार संघातील 6 ग्रामपंचायतीच्या इमारत कार्यालय बांधणी करणेसाठी निधी मंजुर करण्यात आला.
राहुरी नगर पाथर्डी मतदार संघातील राहुरी तालुक्यातील केंदळ बु,तांभेरे , व पाथर्डी मतदार संघातील कोल्हार कोल्हुबाई ,आडगांव ,शिराळ तसेच नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई या गावांना नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधणेसाठी निधी प्राप्त होणार आहे. याआधी संबधीत गावात ग्रामपंचायत इमारत स्वमालकीची तसेच स्वतंत्र नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. येथील गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी वेळोवेळी तनपुरे यांचकडे मागणी केली होती. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकममंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे पाठपुरावा करुन सदर ग्रामपंचायत कार्यालयासाठी निधी उपलब्ध करुन दिलेला आहे. हा निधी ज्या त्या गावांचे लोकसंख्येनुसार तेथील कार्यालय बांधणे साठी मिळणार असुन लवकरच या गावात सुसज्ज अशी ग्रामपंचायत कार्यालये उभी राहणार असल्याने या गावातील सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य समस्थ गावकरी यांनी मंत्री तनपुरे यांना धन्यवाद दिले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत