राहुरी(वेबटीम) राहुरी येथील तनपुरेवाडी परिसरातील सुनिल तनपुरे यांच्या शेताची नांगरणी चालू असताना सर्पमित्र कृष्णा पोपळघट यांनी साडे तीन ते च...
राहुरी(वेबटीम)
राहुरी येथील तनपुरेवाडी परिसरातील सुनिल तनपुरे यांच्या शेताची नांगरणी चालू असताना सर्पमित्र कृष्णा पोपळघट यांनी साडे तीन ते चार फूट विषारी नाग पकडून निर्सगाच्या सानिध्यात सोडल्याची घटना घडली आहे.
तनपुरेवाडी येथील सुनील तनपुरे यांच्या जमिनीमधून एक एक नाग बाहेर आला. नागाला बघताच शेतात काम करणाऱ्या लोकांनी मालक सुनिल तनपुरे यांना माहिती दिली. तनपुरे यांनी लगेच शहरातील सर्पमित्र कृष्णा पोपळघट यांना बोलावून घेतले. काहीवेळातच सर्पमित्र कृष्णा पोपळघट व मुजीब देशमुख यांनी जाऊन सदर नागाला पकडून जीवदान दिले व निसर्गात सोडून दिले. नागाला पकडताच लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला. नाग निघाल्याचे समजताच नागाला बघण्यासाठी शेजारील वास्त्यावरील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत