राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील डॉ.तनपुरे कारखाना हद्दीतील अमरधाममधील शवदाहीनीच्या ठिकाणी अज्ञात व्यक्तिंनी तोडफोड करून नुकसा...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील डॉ.तनपुरे कारखाना हद्दीतील अमरधाममधील शवदाहीनीच्या ठिकाणी अज्ञात व्यक्तिंनी तोडफोड करून नुकसान केल्याची घटना आज बुधवार 13 एप्रिल रोजी उघडकीस आली असून या घटनेने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
डॉ.तनपुरे कारखान्याच्या जागेत असलेल्या अमरधामची दयनीय अवस्था झाल्याने. देवळाली प्रवरा नगरपालिकेने या अमरधामचा कायापालट केला.
यामध्ये नगरपालिकेने याठिकाणी रस्ता दुरुस्ती, पुरुषांसाठी व महिलांसाठी स्वतंत्र बाथरूमची व्यवस्था, विजेचा प्रश्न , तार कंपाउंड, वृक्ष लागवड असे विविध कामे पूर्ण करून ते उपलब्ध करून दिले.
डिसेंबर २०२१ मध्ये अमरधाममधील शवदाहीनीचे लोखंड चोरी केल्याची घटना घडली होती. आज पुन्हा या ठिकाणी शवदाहीनी ठिकाणी अज्ञात व्यक्तिंनी तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे.
माणुसकीला काळीमा फासणारी घटना असून ज्या ठिकाणी माणसाच्या आयुष्याचा शेवट होतो त्याच ठिकाणच्या शवदाहिनीचे नुकसान करणाऱ्या विकृत प्रवृत्तीला चांगलेच धडे शिकवले पाहिजे असे संतप्त नागरिकांतून बोलले जात आहे.
... तर पाच हजार रुपयांचे बक्षीस
अमरधाम मधील शवदाहीनीच्या ठिकाणी नुकसान करणाऱ्या व्यक्तीची माहिती देणाऱ्यास ५००० रुपयांचे बक्षीस सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने जाहीर करण्यात आले असून सर्व माहिती गुपित ठेवली जाईल असे वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक वसंत कदम यांनी सांगितले.
राहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा येथेही शवदाहिनीची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे.येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत