राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील ग्रामपंचायत समोर कुठलीही परवानगी नसताना गैरकायदेशीर खोदकाम करून झेंडा लावत असलेल्या जमाव...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील ग्रामपंचायत समोर कुठलीही परवानगी नसताना गैरकायदेशीर खोदकाम करून झेंडा लावत असलेल्या जमावास रोखत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात ३१ लोकांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस हेडकोन्स्टेबल दिनकर गर्जे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले की, तांभेरे गावातील चौकामध्ये फिक्स पॉईट ड्युटीवर हजर असताना तेथे 25-30 इसम व 20-25 महीला हे निळा कलर मारलेला खांब व निळ्या रंगाचा झेंडा व फावडे व टिकाव हातामध्ये घेवुन ग्रामपंचायत समोरील चौकामध्ये टेम्पो व मोटार सायकलवर तसेच पायी आले. यातील चालकानी त्याच्या ताब्यातील वाहन रोडवरच सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होईल तसेच येणाऱ्या जाणान्या लोकांच्या जिवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने उभे करुन तेथे खड्डा खोदु लागले असता. त्यांना म्हणाले मी पोलीस कर्मचारी असुन मी येथे कायदा व सुव्यवस्था निर्माण होवु नये यासाठी कर्तव्यावर आहे तुमच्याकडे येथे खड्डा खोदण्याची शासकीय परवानगी आहे काय असे विचारले असता, ते म्हणाले की आमचेकडे कुठलीही परवानगी नाही. तरीही आम्हाला येथे चौकामध्ये आमचा झेंडा लावायचा आहे तेव्हा त्यांना म्हणाले की, तुम्ही अशा प्रकारे गैरकायदेशीर खोदकाम करुन येथे कुठल्याही प्रकारचा झेंडा लावु शकत नाही. त्यांना झेंडा लावण्यापासून रोखत असताना जमावातील लोकांनी शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन शासकीय काम करण्यास अडथळा निर्माण केला.
पोलीस कॉन्स्टेबल दिनकर गर्जे यांच्या फिर्यादीवरून अजित तांबे, अक्षय तांबे, अशोक तांबे , राजु तांबे, मार्तंड तांबे, दिपक तांबे,संजय कांबळे ,वैभव चोखर, श्रीकांत तांबे ,शुभम तांबे, स्वन्पील तांबे , प्रसाद तांबे, रेखा तांबे, चित्रा तांबे, मंगल तांबे ,नंदा तांबे , निता तांबे, अर्चना तांबे, मिना तांबे, भाग्यश्री तांबे , रंजना तांबे, मोनिका तांबे, निता तांबे, अनिता तांबे , संगीता तांबे, उषा तांबे, लतिका तांबे , अनिता तांबे, छबु तांबे, सविता तांबे , मंगल तांबे व इतर 10-12 इसम व महीला यांच्याविरुद्ध भादंवि कलम 353,332, 143, 147, 149,504,283 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 103,143 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे करीत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत