कोपरगाव प्रतिनिधी कोपरगाव ज्येष्ठ नागरिक सेवा मंच, ज्येष्ठ महिला समिती, साईगाव पालखी सोहळा व मुंबादेवी तरुण मित्रमंडळ यांच्या संयुक्त वि...
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव ज्येष्ठ नागरिक सेवा मंच, ज्येष्ठ महिला समिती, साईगाव पालखी सोहळा व मुंबादेवी तरुण मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांना नुकताच 'आदर्श माता' पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.
कोपरगाव ज्येष्ठ नागरिक सेवा मंच, ज्येष्ठ महिला समिती, साईगाव पालखी सोहळा व मुंबादेवी तरुण मित्रमंडळ यांच्यावतीने कोपरगाव मध्ये अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला असून बुधवार (दि.०६) रोजी सौ. पुष्पाताई काळे यांच्यासह श्रीमती सिंधूताई कोल्हे, श्रीमती कमलाबाई ठोळे, मुरुमकरताई व चंदाताई लुणावत या मातांना आदर्श पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. कोरोना काळात व समाजासाठी योगदान देणाऱ्या सुतारताई, संगीता मालकर, पुष्पाताई मुंदडा, चंदाताई कोठारी, प्रिती बंब यांचाही याप्रसंगी गौरव करण्यात आला.
यावेळी सौ. सुधा ठोळे, योगगुरु उतमभाई शहा, सौ. शैलजा रोहोम, सौ. रजनी गुजराथी, विश्वात्मक जंगली महाराज आश्रमाचे परमपूज्य विवेकानंद महाराज, सौ. संगिता मालकर, उद्योजक कैलास ठोळे, विजय बंब, उत्तम शहा, हेमचंद्र भवर, याप्रसंगी कांतीशेठ अग्रवाल, अरविंद भन्साळी, अजित लोहाडे, फुलचंद पांडे, दिलीप अजमेरे, डॉ मुरुमकर, डॉ विलास आचारी, योगेश जोबनपुत्रा, सी ए भंडारी, माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे, वनिता मंडळाच्या अध्यक्षा स्वाती मुळे, वंदना चिकटे, शोभादेवी ठोळे, विमला ठोळे आदींसह कोपरगाव ज्येष्ठ नागरिक सेवा मंच, ज्येष्ठ महिला समिती, साईगाव पालखी सोहळा व मुंबादेवी तरुण मित्र मंडळाचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत