राहुरी(वेबटीम) गुहा येथील प्रेरणा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात 90 लाख 25 हजार 983 रुपये नफा झाल...
राहुरी(वेबटीम)
गुहा येथील प्रेरणा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात 90 लाख 25 हजार 983 रुपये नफा झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी दिली.
माजी खासदार प्रसाद तनपुरे व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल प्रगतीपथावर असून संस्थेला स्थापनेपासून अ आँडीटवर्ग मिळालेला आहे.संस्थेचे सभासद, ठेवीदार ,कर्जदार ,कर्मचारी,पदाधिकारी या सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळे पतसंस्थेच्या ठेवी, कर्ज वितरण ,कर्जवसुली,नफा, गुंतवणूक या सर्वांमध्येच या आर्थिक वर्षात वाढ झाली आहे.कोरोना मुळे आर्थिक व्यवहारात मर्यादा असतानाही संस्थेने यशस्वीपणे वाटचाल केली आहे.
संस्थेला गतवर्षी 51लाख 37 हजार रुपये नफा मिळाला होता यावर्षी नफ्यात 39 लाख रुपयांची वाढ झाली संस्थेचे वसूल भागभांडवल एक कोटी 15 लाख रुपये असून गतवर्षी ते एक कोटी तीन लाख होते .निधी व फंड सहा कोटी 59 लाख 36 हजार असून गतवर्षी तो पाच कोटी 93 लाख 96 हजार रुपये होता .वसूल भागभांडवल, निधी व फंड यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत दहा टक्के वाढ झाली. या वर्षाखेरीस संस्थेकडे एकूण 60 कोटी 34 लाख रुपयांच्या ठेवी असून गतवर्षी ठेवी 53 कोटी 13 लाख रुपयांच्या होत्या .ठेवीत 11 टक्के वाढ झाली. गुंतवणूक 28 कोटी 58 लाख रुपये असून गतवर्षी 28 कोटी 20लाख एवढी होती. येणे कर्ज 37 कोटी 87 लाख असून गतवर्षी हे 31 कोटी 53 लाख रुपये होते. कर्ज रकमेत 16 टक्क्यांची सुमारे सव्वा सहा कोटी रुपयांची वाढ झाली. संस्थेचे खेळते भांडवल 70 कोटी तीन लाख असून गतवर्षी ते 62 कोटी 78 लाख रुपये होते .या आर्थिक वर्षात खेळत्या भांडवलात सात कोटी 24 लाख रुपयांची वाढ झाली. वार्षिक उलाढाल 405 कोटी 53 लाख रुपयांची झाली असून गतवर्षी ती 395 कोटी रुपयांची होती. वसुलीचे प्रमाण चांगले राहिल्याने थकबाकीचे प्रमाण अत्यल्प म्हणजे केवळ चार टक्केच आहे .सीडी रेशो 55. % टक्के आहे. संस्थेच्या या आर्थिक यशाचे सर्व श्रेय सभासद, ठेवीदार, कर्जदार ,संचालक पदाधिकारी,कामगार व अधिकारी यांना द्यावे लागेल असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
ग्राहकांना अधिक चांगली बँकिंग सेवा देता यावी म्हणून क्यूआर कोड यु पी आय मोबाईल ॲप व एटीएमची सुविधा पतसंस्थेने या वर्षात उपलब्ध करून दिली आहे.
डिजिटलायझेशन च्या युगात पतसंस्थेने प्रवेश केला असून वेगाने, तत्पर व अधिक चांगली बँकिंग मोबाईल सेवा या माध्यमातून मिळते आहे असेही वाबळे यांनी सांगितले.संस्थेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र शिंदे ,संचालक अशोक उर्हे ,मच्छिंद्र हुरुळे, श्रीकांत जगधने ,शंकर कोळसे ,राजेंद्र गांडूळे,अँड. जगन्नाथ डौले,संजय वर्पे,शोभा लांबे, विजया उर्हे , जनरल मॅनेजर जी.एम. चंद्रे आदी यावेळी हजर होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत