कोपरगाव / प्रतिनिधी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी कोणताही बडेजाव न ठेवता कोपरगाव भेटीत जनार्दन स्व...
कोपरगाव / प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी कोणताही बडेजाव न ठेवता कोपरगाव भेटीत जनार्दन स्वामी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील सोबत होते.
आशा पवार या कोपरगावमध्ये आल्यावर नेहमी जनार्दन स्वामींच्या चरणी नतमस्तक होतात. याकाळात माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या भगवती कॉलनी (कोपरगाव) येथील निवासस्थानी दोनदा कौटुंबिक सदिच्छा भेट दिली आहे. त्यावेळी प्रत्येकवेळी बाबाजींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या सोबत आश्रमात त्याचे गेले असल्याची आठवण पाटील यांनी सांगितली. यावेळी त्या काशीविश्वनाथ महादेव भगवान, नर्मदा माता यांचेही दर्शन घेतल असत. तसेच त्यावेळी आश्रमात मठाधिपती रमेशगिरी महाराज यांचेही दर्शन घेत असत. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष स्व. मोहन चव्हाण साहेब, माधव पाटील (सिव्हिल इंजिनियर), मंगेश पाटील, मिलन पाटील, सुहास वाबळे, प्रियलक्ष्मी मंगेश पाटील, शिल्पा मिलन पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, परवाच्या कोपरगाव भेटीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही समाधीचे व रमेशगिरी महाराज यांचे दर्शन घेतले. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, साई संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार आशुतोष काळे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत