ना.आशुतोष काळेंच्या नियोजित १००० कोटीच्या - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ना.आशुतोष काळेंच्या नियोजित १००० कोटीच्या

कोपरगाव प्रतिनिधी-  कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी अडीच ...

कोपरगाव प्रतिनिधी- 

कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी अडीच वर्षात १००० कोटीच्या विकासकामांची जंत्री उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांच्यापुढे मांडून मतदार संघ विकासाच्या बाबतीत प्रगतीपथावर असल्याचे दाखवून देत उपमुख्यमंत्र्यांची शाबासकी मिळवून नियोजित १००० कोटीच्या विकास आराखड्याला देखील संमती मिळवली आहे.


बुधवार (दि.०६) रोजी  राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार गृहमंत्री ना. दिलीपराव वळसे पाटील तसेच ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या समवेत ना. आशुतोष काळे यांच्या आग्रहास्तव बुधवारची कॅबिनेट बैठक पुढे ढकलून कोपरगाव मतदार संघाच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते पंचायत समितीच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच पंचायत समिती, पोलीस स्टेशन व बस स्थानकाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी जाहीर करण्यात आलेल्या जाहीर सभेत ना. आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्र्यांपुढे अडीच वर्षात केलेल्या १००० कोटीच्या विकास कामांची माहिती देवून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी करण्याच्या दृष्टीने आगामी काळात करण्यात येणाऱ्या १००० कोटीच्या विकास कामांचा आराखडा मुद्देसूदपणे मांडला.


यामध्ये कोपरगाव शहरात अनेक ठिकाणी असलेल्या शासकीय जमिनीवर व्यापारी संकुल बांधणे, बसस्थानकाच्या चहू बाजूने व्यापारी संकुल उभारणे, कोपरगाव शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी कोपरगाव शहर डासमुक्त होण्यासाठी भूमिगत गटारी,एकात्मिक रस्ते विकास,आवास योजने अंतर्गत नागरिकांना सदनिका, तीर्थक्षेत्र विकास, तसेच ग्रामीण भागातील ४० गावासाठी व्यायाम शाळा साहित्य, प्रत्येक गावांत स्मशानभूमी, पाणी योजना व वीज व्यवस्था,मंजूर बंधाऱ्याचे नुतनीकरण, सबजेल व मुलांचे व मुलींचे वस्तीगृह, आदिवासी भवन, माजी सैनिक भवन उभारणे, म्हाडा योजने अंतर्गत ६०० घरे शहरात उभारणे, कोपरगांव शहरातील नदी संवर्धन योजने अंतर्गत घाट सुशोभीकरण, नवीन सब स्टेशनची निर्मिती करून रोहीत्रांची क्षमता वाढविणे, सुशिक्षित बेरोजगारांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारणे आदी महत्वाच्या कोपरगाव शहर व ग्रामीण भागाच्या विकासाचा १००० कोटीचा नियोजित आराखडा उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांच्यापुढे मांडला. मागील अडीच वर्षात ना. आशुतोष काळेंनी कोरोनाच्या संकटात प्रतिकूल परिस्थितीत देखील मतदार संघात केलेल्या विकास कामांमुळे प्रभावित होवून उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत कोपरगाव विधानसभा मतदार संघासाठी निधी कमी पडू  देणार नाही अशी ग्वाही देवून दिलेला शब्द पाळतो अशा शब्दात ना. आशुतोष काळेंच्या १००० कोटीच्या विकास कामांच्या आराखड्याला जाहीरपणे संमती दिली आहे.


मागील अडीच वर्षात कोरोनामुळे अर्थव्यवस्था अडचणीत असतांना देखील ना. आशुतोष काळेंनी १००० कोटीचा निधी मतदार संघासाठी खेचून आणला आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाचे मळभ दूर होवून रुळावरून घसरलेली राज्याच्या अर्थव्यवस्थेची गाडी पुन्हा रुळावर आली आहे. त्यामुळे राज्याचा भविष्यकाळ हा उज्वल असून कोपरगाव विधानसभा मतदार संघाला देखील ना. आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून येत्या काळात नियोजित आराखड्यानुसार विकासकामांसाठी निधीचा पुरवठा होणार आहे. त्यामुळे विकासापासून दूर गेलेल्या कोपरगाव विधानसभा मतदार संघाला विकासाच्या वाटेवर आणण्यात ना.आशुतोष काळे यशस्वी झाले आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत