कोपरगाव पीपल्स बँकेत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची स्थापना - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव पीपल्स बँकेत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची स्थापना

कोपरगाव(वेबटीम)  नवीन आलेल्या आरबीआय च्या नियमानुसार 100 कोटींच्या वर ठेवी असणाऱ्या सर्व अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांना तज्ञ सदस्यांचे बोर्ड ऑफ ...

कोपरगाव(वेबटीम)



 नवीन आलेल्या आरबीआय च्या नियमानुसार 100 कोटींच्या वर ठेवी असणाऱ्या सर्व अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांना तज्ञ सदस्यांचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट ची स्थापना करण्याचे निर्देश दिले आहे


 त्यानुसार नुकतीच कोपरगाव पीपल्स बँकेने तज्ञ सदस्यांचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट समितीची स्थापना केली आहे या समितीमध्ये आर बी आय च्या निर्देशानुसार काही सदस्य सध्याच्या संचालक मंडळ मधून तर काही सदस्य संचालक मंडळाच्या बाहेरील घेण्यात आलेले आहे  

बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्यपदी कैलासशेठ ठोळे, (संचालक सदस्य )डॉक्टर विजय कोठारी (संचालक सदस्य) श्री सुनिल कंगले (संचालक सदस्य) श्री संदीप रोहमारे (कृषी क्षेत्र) सी.ए.अभिमन्यू पिंपळवाडकर ( अकाउंट क्षेत्र) श्री धनंजय शेळके (सामाजिक क्षेत्र),श्री विजय नायडू (कॉम्प्युटर क्षेत्र) 


6 एप्रिल रोजी सर्व नूतन सदस्यांचा बँकेच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला याप्रसंगी बँकेचे जनरल मॅनेजर श्री एकबोटे साहेब यांनी बोर्ड ऑफ मॅनेजमेंट बद्दल माहिती दिली.

बँकेचे चेअरमन श्री सत्यम  मुंदडा यांनी या सर्व तज्ञ संचालकांचा बँकेस निश्चित फायदा होईल अशी आशा व्यक्त केली सर्व नूतन सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

माजी चेअरमन श्री अतुल काले यांनी आभार व्यक्त केले

 याप्रसंगी श्री अशोकजी रोहमारे , बँकेचे व्हाईस चेअरमन सौ प्रतिभा शिलेदार, संचालक श्री कल्पेश शहा, एडवोकेट भोकरे, श्री सुनील बंब, श्री हेमंत बोरावके, श्री अतुल काले ,श्री धरमभाऊ बागरेचा, रवींद्र ठोळे , सौ प्रभावती पांडे व कर्मचारी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत