देवळाली प्रवरा/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील राजवाडा परिसरात राजवाडा प्रतिष्ठानच्या वतीने उद्या गुरुवार १४ एप्रिल रोजी सक...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील राजवाडा परिसरात राजवाडा प्रतिष्ठानच्या वतीने उद्या गुरुवार १४ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने अभिवादनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी माजी आमदार चंद्रशेखर कदम, लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष सत्यजीत कदम, तहसीलदार फसीयोद्दीन शेख, पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे, मुख्याधिकारी अजित निकत आदिंसह मान्यवर उपस्थित राहणार आहे.
तरी या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन राजवाडा प्रतिष्ठान, देवळाली प्रवरा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत