लैगिक संबंध आणि आजची तरुण पिढी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

लैगिक संबंध आणि आजची तरुण पिढी

  समाजात काही घडलं की आजच्या डिजिटल जगात  लगेच फोनवरती आपल्याना कळतं. फोन हा आजच्या  काळाची गरज तर नाही पण माणसांनी ती गरज बनवून टाकली आहे. ...

 समाजात काही घडलं की आजच्या डिजिटल जगात  लगेच फोनवरती आपल्याना कळतं. फोन हा आजच्या  काळाची गरज तर नाही पण माणसांनी ती गरज बनवून टाकली आहे. जसा फोन चांगला तसा वाईटही...!!!



सकाळी न्युज पोर्टल वरती जाऊन बातम्या वाचत होती. गेल्या आठ दिवसांत चार ते पाच अपहरणाच्या केस राहुरी पोलिस स्टेशन मध्ये आल्या आहेत. ज्यांचं  अपहरण झालं त्यांचं वय १३,१५,१४,१७, १६ ह्या वयातील.


हे सगळं वाचून मन अगदी थक्क झालं. ज्या वयात मुलींनी योग्य ते शिक्षण घ्यावे त्या वयात ह्या सगळ्या गोष्टी समोर येणं म्हणजे दुर्दैवच.


आता प्रश्न पडतो की त्याला अपहरण म्हणायचं का आपल्या मर्जीने पळून जाण? 

संध्याकाळी ६ वाजता १३ वर्षाची मुलगी मोबाईलला  बॅटरी टाकून  येते म्हणून गेली आणि परत आली नाही. १५ वर्षीय मुलगी  घरातले सगळे झोपल्यावर घरातून निघून जाते. अगदी आपल्या आई-बापाचा विचार न करता. असेही म्हणता येईल की त्यांना फूस लावली होती. 


पोलिस तपासामध्ये  मूल अथवा मुली नको त्या ठिकाणी सापडतात. यावरून कळत की मुला-मुलींना sex education देणं किती  महत्वाचं आहे.


आमावस्याची रात्र  जशी काळोखी असती. भयाण अंधारात जीव जसा कासावीस होतो  अगदी पुढचा पाऊलं टाकायला  भीती वाटते तशी अवस्था त्या आईची असते.

जीर्ण झालेला वटवृक्ष जसा जमिनीशी घट्ट उभा असतो आणि त्यात विज कडाकवून त्यावर पडते आणि तो एवढा मोठा वटवृक्ष क्षणात खाली पडतो तसा तो बाप क्षणात तुटून जातो.


आपली मुलं नको त्या ठिकाणी, नको त्या अवस्थेत मिळणं म्हणजे पालकांसाठी खुपच  भयानक वस्तुस्थिती...!!!


पण ह्या सगळ्यामध्ये चुकी कुणाची? आई-वडिलांची या मुलांची? का समाजाची? का आधुनिक तंत्रज्ञानाची ? Sex कमी वयात करणं योग्य की अयोग्य? 


हे सगळे प्रश्न मनात सारखे यायला लागले. आपल्या पेक्षा वयाने , अनुभवाने आणि त्याच फील्ड मध्ये काम करणारे  Dr. मोहन देस  याना मी फोन केला. अगदी माझ्या मनात आलेले प्रश्न मी त्यांना विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले की , लैगिक संबध  झाल्यावर  मुलींना त्या गोष्टी करताना  ही त्रास होतो आणि केल्यावर पण त्रास होतो. लहान वयात कंडोम काय असत ह्याची पुरेपूर माहिती नसती. त्याचा परीणाम असा की ती मुलगी पुढे जाऊन गर्भवती राहते. मुलींना कमी वयात अंगावरती जबाबदाऱ्या पडतात. त्यांना नाते संबंध सांभाळता येत नाही. लहान वयात maturity नसते ,  कुणाशी मनमोकळ्या पणाने बोलताही येत नाही. खूप सगळ्या गोष्टींना सामोरे जावे लागते. समाज बोलतो ते वेगळच  असत. काही गुप्तरोग किंवा HIV सारख्या रोगालाही सामोरे जावे लागतं त्या काळामध्ये  लहान वयात काही कळत नाही. म्हणजेच लहान वयात sex करणं हे धोकादायकच..!!!!


जर मुलीच वय सोळा वर्ष आणि मुलाचं 22 वर्ष असेल तर  त्यांना प्रेम झालं भावनेच्या आहारी जाऊन ते पळून जातात त्यानंतर त्या मुलावर  पोस्को कायद्यानुसार त्याला जेल होती आणि त्या मुलाचं  आयुष्य बरबाद होत. त्याच्या मनात बदलाची भावना असेल तर तो त्या मुलीलाही नंतर त्रास देतो म्हणजे दोघांचं आयुष्य बरबाद होत. ह्या सगळ्या गोष्टींना जबाबदार कोण❓


भारत सरकारने १८ च्या पुढं लैगिक  संबंध  म्हणजेच लग्नासाठी  परवानगी दिली आहे पण  त्या आधी ह्या गोष्टी केल्या जात  असेल तर त्यावर पोक्सो कायदानुसार कारवाही केली जाऊ शकते.



वयामध्ये आलेल्या मुलांना समजून सांगण्याची पालकांची जबाबदारी असते. ह्या वयात  Attraction होणं साहजिकच आहे पण ह्या परिस्थितीतून  बाहेर कस निघायचं. स्वतःला कंट्रोल कस करायचे? एकतर्फी प्रेम म्हणजे काय? केव्हा करावं? सेक्स म्हणजे काय? गुप्तरोग , एड्स बद्दल माहिती देणे.


हे सगळं मुलांना योग्य वयात सांगायला हवे. एक मित्र बनून सांगितलं तर ह्या गोष्टी लगेच त्यांना कळतात.


भारतीय समाजाबद्दल विचार केला असता, कामजीवन आणि लैंगिक शिक्षणाबद्दल बरेच समज गैरसमज  समाजात प्रचलित असल्याचे दिसून येते. सेक्स बद्दल घरात बोलणं योग्य नसत अस पालकांना वाटतं आणि मग वयात आलेले मूल-मुली  आपल्या मित्र- मैत्रिणीकडून अर्धवट माहिती घेतात आणि अयोग्य  वयात चुकीचे निर्णय घेतात. मुलगी पळून जाऊन घरी आली तर तीच कमी वयात लग्न लावून देतात. अश्या केसेस पण मी बघितल्या  आहेत की ती मुलगी तेराव्या वर्षी प्रेमात पडते घरी समजलं तर लग्न लावून देतात. लग्नापेक्षा  त्या मुलीला समजून घेणे किंवा तिला योग्य प्रकारे माहिती देणे हे नक्की चांगलच....


'Gestalt Therapy'  या पुस्तकाचे लेखक डॉक्टर एफ. एस. पल्स यांनी 'Anti-social ana Aggression'  या प्रकरणात मांडलेल्या विचारांप्रमाणे लैगिकता ही निसर्गतच लहरी, तर्काच्या चौकटीत न बसणारी व मनाचा संपूर्ण ताबा घेणारी असते त्यामुळेच तिच्यात एक प्रकारची  उत्कटता असते.


तिला नियमाच्या चौकटीत बसवून अधिकृत स्वरूप दिल्यास तिच्यात कुत्रिमपणा येवून मनुष्य उत्कट अनुभवला मुकण्याची शक्यता असते.


Rank या मानसशास्त्राने  असे म्हंटले  आहे की...The place to learn the facts of life is in the gutter, where their mystery is respected...


 मनिषा रंजना बाळासाहेब लांबे✍🏻

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत