कोळपेवाडी/वेबटीम:- कोणत्याही विकासकामासाठी तांत्रिक मान्यता अत्यंत महत्वाची असते. ५ नं. साठवण तलावाला ज्यावेळी तांत्रिक मान्यता मिळाली त्याव...
कोळपेवाडी/वेबटीम:-
कोणत्याही विकासकामासाठी तांत्रिक मान्यता अत्यंत महत्वाची असते. ५ नं. साठवण तलावाला ज्यावेळी तांत्रिक मान्यता मिळाली त्यावेळीच साठवण तलावाचे काम होणार यावर शिक्कामोर्तब झाले होते. फक्त प्रशासकीय मंजुरीची प्रतीक्षा होते. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारने जास्त प्रतीक्षा पाहू दिली नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ५ नं. साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधीची प्रशासकीय मंजुरी आघाडी सरकारकडून मिळविली असली तरी ५ नं. साठवण तलाव ‘ये तो अब झ्याकी आहे, आगे आगे देखो होता है क्या अशा शायरी अंदाजातून कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे सुतोवाच श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी केले.
कोपरगाव शहरातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या ५ नं. साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधीची प्रशासकीय मंजुरी मिळवून आणल्याबद्दल कोपरगाव शहरातील नागरिकांच्या वतीने त्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला याप्रसंगी सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात ४ नं. साठवण तलावासाठी २ कोटी निधी आणला मात्र काम होवू शकले नाही. कोपरगाव शहरात पिण्याचे पाणी साठविण्यासाठी प्रत्येक घरासमोर दिसणाऱ्या पाण्याच्या टाक्या स्वस्थ बसू देत नव्हत्या. महिला भगिनींना होणाऱ्या त्रासाचे गांभीर्य ओळखले होते. त्यामुळे कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडवयाचाच असा मनाशी निश्चय करून त्यासाठी २०१९ च्या निवडणुकीपूर्वी आणि निवडून आल्यावर देखील प्रामाणिक प्रयत्न करीत होतो. त्या प्रयत्नाचे फलित आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या अनमोल सहकार्यातून महाविकास आघाडी सरकारकडून ५ नं. साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधीची प्रशासकीय मंजुरी मिळविली. पाणी प्रश्न सोडविण्याचा दिलेला शब्द पूर्ण होत आहे याचा विशेष आनंद होत आहे. शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला असला तरी ही कामे म्हणजे फार थोडी आहेत. कोपरगाव शहरात विकासाचे अनेक प्रश्न बाकी आहेत.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ज्याप्रमाणे मार्गी लावला त्याप्रमाणे हि राहिलेली विकासकामे देखील येत्या काही महिन्यात पूर्ण होतील असा त्यांनी उपस्थितांना विश्वास दिला.
याप्रसंगी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळे, जेष्ठ नागरिक सेवा मंचचे अध्यक्ष विजय बंब, उद्योजक कैलास ठोळे, महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, डॉ. अजय गर्जे, महाराष्ट्र राज्य लिनेस क्लबच्या बहुप्रांतिक अध्यक्षा डॉ. वर्षा झवर, सौ. सुधा ठोळे, कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष शंतनू धोर्डे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, शिवसेनेचे शहराध्यक्ष कलविंदरसिंग दडीयाल, नगरपरिषदेचे माजी गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, हाजी मेहमूद सय्यद, भरत मोरे, डॉ. तुषार गलांडे, डॉ.अतिष काळे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, रमेश गवळी, फकीर कुरेशी, प्रसाद नाईक, राजेंद्र बंब आदींसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक अॅड. विद्यासागर शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन रमेश गवळी यांनी केले तर आभार शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत