अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक ऊर्जा केंद्र होऊ शकले नाही याची खंत वाटते -अँड.नितीन पोळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक ऊर्जा केंद्र होऊ शकले नाही याची खंत वाटते -अँड.नितीन पोळ

कोपरगाव/वेबटीम:- कोपरगाव शहरात अण्णा भाऊ साठे यांचे सर्वात पहिले स्मारक झाले हे जरी खरे असले तरी दुर्दैवाने हे स्मारक समाजाचे ऊर्जा केंद्र ह...

कोपरगाव/वेबटीम:-



कोपरगाव शहरात अण्णा भाऊ साठे यांचे सर्वात पहिले स्मारक झाले हे जरी खरे असले तरी दुर्दैवाने हे स्मारक समाजाचे ऊर्जा केंद्र होऊ शकले नाही याची खंत वाटते असे मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले



अण्णा भाऊ साठे  यांनी आपल्या हयातीत शेतकरी,कष्टकरी, कामगार,मजूर,दिन दलित स्रिया यांचे दुःख जगाच्या व्यासपीठावर मांडले कम्युनिस्ट विचार धारा स्वीकारून आयुष्यभर त्यागी वृत्ती स्वीकारली त्यांच्या नंतर त्यांच्या विचारांचा प्रचार, प्रसार होणे अपेक्षित होते मात्र त्या ऐवजी राजकीय लोकांनी अण्णा भाऊ साठे यांचा वापर आपली मतपेटी भक्कम करण्यासाठी केला असल्याचे दिसून येते



कोपरगाव मध्ये माजी मंत्री शंकरराव जी कोल्हे साठे यांनी  त्या काळातील समाज बांधवांनी केलेली मागणी विचारात घेऊन कोपरगाव शहरात १९८० च्या दशकात अण्णा भाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा उभा केला गोर गरीब अडाणी समाज एकत्र येऊन अण्णा भाऊ साठे यांच्या विचाराने प्रेरित झाला मात्र हे स्मारक समाजाचे ऊर्जा केंद्र न होता दुर्दैवाने अनेक समाज बांधवांनी आपले जीवन जगण्याचे साधन बनवले 

गेल्या बारा वर्षात कोपरगाव शहरात अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे या ना त्या कारणाने राजकारण होत आहे असेच दिसते अनेक समाज बांधवांनी केलेल्या पाठपुराव्याने कोपरगाव शहरात पूर्णाकृती पुतळा आणला मात्र श्रेय वादाच्या लढाईत पुतळा उदघाटन करण्याच्या प्रतीक्षेत आहे

गेल्या दोन चार दिवसांपासून शहरात अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण करण्यावरून उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहे मात्र या समाज बांधवांना दोष देऊन चालणार नाही कारण कोपरगाव शहरातील प्रस्तापित राजकारणी आपली मत पेटी भक्कम करण्यासाठी आपापल्या कार्यकर्त्याना बळ देत असून दुर्दैवाने यात समाजाचा बळी जात आहे 

मागील कालावधीत माजी मंत्री कोल्हे यांनी पुतळ्यासाठी योगदान दिले आहे असे त्या गटाचे म्हणणे आहे मात्र या उलट आ काळे यांनी दोन वर्षांच्या कालावधीत विविध समाजाच्या समाज मंदिर व सांस्कृतिक भावना साठी निधी उपलब्ध करून दिला मात्र दुर्दैवाने यातून मातंग समाजाला काहीच पदरी पडले नाही हेही तितकेच खरे आहे असे असले तरी आता उपमुख्य मंत्री यांच्या उपस्थितीत आ काळे यांनी पुतळ्याचे अनावरण करण्याचा मानस आपल्या कार्यकर्त्या च्या माध्यमातून व्यक्त केला असून आज होणाऱ्या कार्यक्रमास प्रशासनाने परवानगी नाकारली आहे त्यामुळे आ काळे यांनी समाज बांधवांच्या मागणी प्रमाने समाजाच्या सांस्कृतिक भावनांसाठी २५ लक्ष रुपयांचा निधी जाहीर करावा

अण्णा भाऊ साठे स्मारकाच्या स्थापणे पासून समाज बांधवांनी या स्मारकाकडे एक ऊर्जा केंद्र म्हणून पाहिले असते आणि आपला दबाव गट निर्माण केला असता तर आज नक्कीच समाज बांधव राजकीय नेत्यांवर दबाव निर्माण करण्यात यशस्वी झाले असते मात्र दुर्दैवाने हे स्मारक चळवळीचे ऊर्जा केंद्र न होता राजकीय सोय झाली असल्याने मनस्वी खंत वाटते असेही या पत्रकात म्हटले आहे

1 टिप्पणी

  1. *सर्व पक्षीय नेते मंडळी बोलवुन उद्घाटन करा..*

    *राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब सह मुख्यमंत्री उध्दव जी ठाकरे साहेब विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेब महसूल मंञी बाळासाहेब थोरात मनसे प्रमुख राज जी ठाकरे साहेब तसेच आर. पी. आय. चे केंद्रीय मंत्री समाज कल्याण विभागाचे रामदास आठवले साहेब ंवचिताचे नेते प्रकाश जी आंबेडकर साहेब इतरांना बोलवा आम्ही ही सोबत येतो मग...*

    *कळवा आपल्या भुमिका काय मत आहे आपले*

    सचिन शिंदे
    औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष
    *क्रांतिवीर लहुजी टायगर सेना महाराष्ट्र राज्य*
    8767075040

    उत्तर द्याहटवा