राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- राहुरी फॅक्टरी येथील जय हिंद क्रिकेट क्लब व प्रशांत काळे मित्र परिवार आयोजित जयहिंद प्रीमियर लीग भव्य राज्यस्तरीय...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-
राहुरी फॅक्टरी येथील जय हिंद क्रिकेट क्लब व प्रशांत काळे मित्र परिवार आयोजित जयहिंद प्रीमियर लीग भव्य राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत टाकळीमिया येथील शफीकभाई इलेव्हन संघाने प्रथम पारितोषिक पटकाविले आहे.
राहुरी फॅक्टरी येथील श्री.छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथील जयहिंद क्रिकेट क्लब मैदानावर २६ मार्च ते १ एप्रिल दरम्यान जयहिंद प्रीमियर लीग-२०२२ भव्य राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पार पडला. स्पर्धेत अंतिम सामना शफीकभाई इलेव्हन टाकळीमिया व पाटील इलेव्हन, पढेगाव यांच्यात झाला यात शफिकभाई इलेव्हन संघाने प्रथम पारितोषिक ७१ हजार रुपये, होन्डा शाईन मोटारसायकल आणि आकर्षक ट्रॉपी पटकाविले आहे.
द्वितीय बक्षीस ५१ हजार रुपये, ५ ग्रॅम सोन्याची अंगठी व आकर्षक ट्रॉपी पढेगाव येथील पाटील इलेव्हन संघाने पटकाविले आहे.
तृतीय बक्षिस ४१ हजार रुपये,एलईडी टीव्ही व आकर्षक ट्रॉपी दयावान इलेव्हन संघाने प्राप्त केले.
चतुर्थ बक्षीस ३१ हजार, स्पोर्ट्स सायकल व आकर्षक ट्रॉपी येवले फायटर्स, येवले आघाडा संघाने मिळविले आहे.
या स्पर्धेचे पारितोषिक नगराध्यक्ष सत्यजितदादा कदम, उपनगराध्यक्ष प्रकाशभाऊ संसारे, राहुरी अर्बन संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे, युवा नेते प्रशांत काळे, अमोल कदम, संदीप कदम, सचिन कोठुळे, सचिन जाधव बाळासाहेब आढाव, संदीप साठे, डॉ.शेकोकार,डॉ सचिन मुसमाडे, राजेंद्र बोरुडे, किशोर नाना बनकर (सरपंच पढेगाव),मारुती मोरे, संतोष चोळके डॉ. आप्पासाहेब चव्हाण,दत्तात्रय साळुंके, ज्ञानेश्वर वाघ,नितीन वाघ, सोमनाथ कीर्तने आदींच्या उपस्थित पार पडले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शशी दादा नालकर, गोविंद खवडे, धनंजय डोंगरे, विकी मुंढे,गजानन घुगरकर, किशोर चोथे, प्रशांत शेटे,महेश वाळके,सनी गायकवाड, योगेश गायकवाड, सतीश वाघ,स्वप्नील बोरुडे,संदीप गायकवाड, धनंजय मुंडे, दीपक साळवे, दीपक आल्हाट, अमोल गुंजाळ, सागर सिनारे,बापू सरोदे , बंटी भगत व जय हिंद क्रिकेट क्लबचे सर्व सदस्य आदींनी परिश्रम घेतले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत