राहुरी सेंट्रल बॅकेंंच्या शाखा अधिका-याकडुन पदाचा गैरवापर करत - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी सेंट्रल बॅकेंंच्या शाखा अधिका-याकडुन पदाचा गैरवापर करत

राहुरी/वेबटीम:-   राहुरी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा शाखा अधिकारी बॅकेंतच तर्राट होऊन अनेक खातेदारांची हुज्जत घालत ग्राहकांची दिशाभूल करून...

राहुरी/वेबटीम:-


  राहुरी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा शाखा अधिकारी बॅकेंतच तर्राट होऊन अनेक खातेदारांची हुज्जत घालत ग्राहकांची दिशाभूल करून आपल्या पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप मानोरी येथील ग्राहक सेवा केंद्र चालकाने केला आहे. तशी तक्रार ओरंगाबाद येथील क्षेञीय कार्यालयाडे करण्यात आली आहे.

     


   

 मानोरी (ता.राहुरी) येथील सेंट्रल बॅकेचे ग्राहक सेवा केंद्र चालक शिवप्रसाद पवार यांनी सेन्ट्रल बॅक ऑफ इंडियाचे राहुरीचे शाखा अधिकारी संजय भोर यांनी ग्राहकांची दिशाभूल करून मला अडकविचा प्रकार केला असल्याची तक्रार वरीष्ठाकडे केली आहे. आपल्या तक्रारीत पवार यांनी म्हटले आहे की, सोमवार दि.२८ मार्च रोजी प्रिंप्री-वळण येथील एका खातेदारांनी माझ्या मानोरी येथील ग्राहक सेवा केंद्रात आपल्या आईच्या खात्यात पंधरा हजार रूपये डिपॉझीट केले होते. मंगळ दि.२९ मार्च रोजी सदर खातेदार पीक कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बॅकेत गेला असता तुमच्या खात्यात फक्त पाच हजार रूपयेच डिपॉझीट झाले आहे.अशी माहीती शाखा अधिकारीनी देत मानोरी येथील ग्राहक सेवा चालकांने तुमच्या खात्यात दहा हजार रूपये भरणा कमी केला असल्याचे सांगितले, व  तात्काळ त्यांनी बॅकेतीलच एका कर्मचा-यांकडून ग्राहक सेवा चालकाविरोधात तक्रार अर्ज लिहुन घेऊन सदर अर्जावर त्या ग्राहकांचा अंगठा घेत ओरंगाबाद येथील क्षेञीय कार्यालयाकडे ती तक्रार पाठविण्यात आली सदर घटना  खातेदारांनी मानोरी येथील ग्राहक सेवा केंद्र चालकाना फोन करून सांगितली आढाव यांनी तात्काळ पंधरा हजार रूपये भरणा केल्याचे पुरावे घेत बॅक गाठली व सदर पुरावे शाखा अधिका-यांने दाखवत फोनवरून सदर माहिती वरिष्ठांना दिली. सदर प्रकरण अंगाशी आल्याचे समजात शाखा अधिकारी यांनी दुस-या दिवशी पुन्हा त्या खातेदाराला बोलुन घेत माझी काही तक्रार नाही असे लिहुन घेत सदर अर्ज वरिष्ठांना पाठवत सारवासार  केली.घटनेच्या दिवशी शाखा अधिकारी हा बॅकेतच मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत अलेल्याचा देखील आरोप मानोरी येथील ग्राहक सेवा चालक शिवप्रसाद पवार यांनी केली आहे.त्यामुळे येथील सिसीटिव्हि फुटेज चेक करून सतत या ना त्या कारनाने चर्चेत असलेल्या या अधिका-यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

शाखा अधिकारी हा बॅकेतच कायम नशेत असतो बॅकेंच्या कामकाजासाठी बॅकेत गेल्यावर त्याने अनेक वेळा माझ्याशी हुज्जत घातल मला एकाद्या प्रकरणात गोवण्याची  धमकी यापुर्वीच दिली होती.त्यात आता ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेत माझी खोटी तक्रार वरीष्ठांकडे केली आहे.- शिवप्रसाद पवार,तक्रारदार


मानोरी येथील ग्राहक सेवा केंद्रात पंधरा हजार रूपयांचा भरणा केला होता. राहुरीतील बॅकेत गेलो असता खात्यात फक्त पाच हजार रूपये भरले असल्याचे शाखा अधिकारी भोर यांनी सांगितले त्यांनी तात्कळ तेथील एका कर्मचा-यांकडून अर्ज लिहुन घेत त्यावर माझा अंगठा घेतला. पुन्हा दुस-या दिवशी बोलवुन एका अर्जावर अंगठा घेतला- अदिनाथ आगलावे,ग्राहक



सदर खातेदाराने स्व:खुशीने तक्रार केलेली आहे.नंतर त्यांनी पुन्हा आमची तक्रार नसल्याचा अर्ज दिला आहे.आता प्रकरण मिटले आहे- संजय भोर,शाखाअधिकारी










 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत