राहुरी(प्रतिनिधी) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, डॉ. बाबासाहेब संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे आणि रविदासीया चेंबर ऑफ कॉमर्स ...
राहुरी(प्रतिनिधी)
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, डॉ. बाबासाहेब संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे आणि रविदासीया चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.१० एप्रिल रोजी शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात सकाळी १० वाजता युवा उद्योग व्यवसाय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये युवकांना शासनाच्या विविध योजना, उद्योग, व्यवसाय, प्रशिक्षण व स्पर्धा परीक्षा, महिलांचे बचत गट यांच्या विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार असून, या शिबीरात सहभागी होण्याचे आवाहन सुभाष मराठे, राजेश उंबरकर, संदिप सोनवणे व प्रितम सरदेसाई यांनी केले आहे.
या कार्यक्रमात युवा उद्योजकांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी समाज कल्याणचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार संग्राम जगताप, अभ्युदय बँकेचे अध्यक्ष संदीप घनदाट, चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त रामकिसन देवढे, प्रदेश सचिव सुभाष चिंधे, बार्टीचे विभाग प्रमुख उमेश सोनवणे, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे दत्तात्रय बोरुडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.
उपस्थित युवकांना जिल्हा व्यवस्थापक (उमेद) सोमनाथ जगताप, प्रकल्प अधिकारी (एम.सी.ई.डी.) तात्यासाहेब जिवडे, बार्टीचे प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद, समाज कल्याणचे संदीप फुंदे, समशेर तडवी, अतुल दावंगे मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमासाठी चर्मकार विकास संघ व लोकनेते माजी आमदार सीताराम घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठानचे सहकार्य लाभत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत