राहुरी(वेबटीम) राहुरी येथील बाजार समितीसमोर शिवसेनेच्या आयएनएस विक्रांतच्या नावाखाली करोडो रुपयांचा घोटाळा करणाऱ्या किरीट सोमय्याचा निषेध ...
राहुरी(वेबटीम)
राहुरी येथील बाजार समितीसमोर शिवसेनेच्या आयएनएस विक्रांतच्या नावाखाली करोडो रुपयांचा घोटाळा करणाऱ्या किरीट सोमय्याचा निषेध करून जोडो मारो आंदोलन करण्यात आले.
भारतीय नौदलातील आय एन एस विक्रांतच्या नावाखाली करोडो रूपयांचा घोटाळा करून सर्वसामान्य जनतेला, देशाला फसविणाऱ्या देशद्रोही, महाराष्ट्र द्रोही किरट सोमाय्यांचा शिवसैनिकांनी जोरदारपणे निषेध करून जोडो मारो आंदोलन केले.
शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भागवत तालुकाप्रमुख विजय ढोकणे, उपप्रमुख सचिन म्हसे, विजय शिरसाठ कैलास शेळके, युवा सेना तालुकाप्रमुख रोहन भुजाडी, अशोक देवरे , सोमनाथ फुलारे, अवधूत सोलट, सतीश माने, शहाजी वराळे महेश आवटी पांडुरंग म्हसे, शुभम बोर्डे, राजेंद्र सोनवणे, प्रतीक भुजाडी जितेंद्र माने , सागर मोरे, उमेश कवाने सुनील शेलार , राजेंद्र सातभाई, राजेंद्र मकासरे, दीपक पंडित, सचिन करपे प्रतीक आघाव आदींसह मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत