पानेगांव( वार्ताहर)- वेध, शास्त्र, पुराणं समंत भगवंताकडे जाण्याचा मार्ग असल्याचं गोणेगांव संस्थानचे मठाधिपती महंत भगवान महाराज जंगले शास्त्र...
पानेगांव( वार्ताहर)-
वेध, शास्त्र, पुराणं समंत भगवंताकडे जाण्याचा मार्ग असल्याचं गोणेगांव संस्थानचे मठाधिपती महंत भगवान महाराज जंगले शास्त्री यांनी पानेगांव (ता. नेवासे)संत ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याचे किर्तन रुपी सेवेत बोलतं होते.
चार वेधाची निर्मिती भगवंताच्या श्वासातून झाली.वेधाचा अभ्यास करताना ६ शास्त्र निर्माण होऊन १८पुराणं झाली.संत महंतांनी ते आचरणात आणून ज्ञान प्राप्ती केल.त्यानंतर अनेक सांप्रदायाचे निर्मिती झाली.संत ज्ञानोबा माऊली,संत तुकोबांनी आपल्या मराठी भाषिकांना वेध शास्त्र समंत आणखी सोप्या भाषेत उपलब्ध करून दिले.असा संतांचे अजाण उपकार आहेत.त्यांचा मार्गाचा अवलंब करून निश्चितच आपल्या ध्येयापर्यंत पोहचू शकतो.
आपल्या किर्तन रुपी सेवेत त्यांनी संत महंत दाखले देवून साक्षात भगवान श्रीकृष्ण, प्रभू रामचंद्र सत्य युगामध्ये राम अवतार तर कलीयुगाच्या सुरुवातीला भगवंत श्रीकृष्णाचा अवतार धारण झाला भगवंताने आपल्या भक्तांसाठी वेगवेगळ्या रुपात येवून भक्तांचे रक्षण केले.
आज किर्तन रुपी सेवेत महाभारत ,रामायण बरोबरच सध्याची परिस्थिती काय आहे. महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज, माॅसाहेब जिजाऊ यांचे संस्काराची गरज येथून पुढे आहे .शिक्षणाची कास धरा एकामेकांच्या सानिध्यात राहून जिवन आणखी सुखमय कसं होईल ते बघा हे सत्य बोला ,सत्य वागा आपल्याला कोरोनाने शिकवलं आहे. हभप जंगले महाराज शास्त्री यांनी सांगितले.
काल्याचे किर्तनासाठी राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख पाटील,संत ज्ञानेश्वर संस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, सोनई पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन बागूल, विश्वस्त कैलास जाधव,मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, लोकनियुक्त सरपंच संजय पाटील जंगले, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय घोलप मुळा कारखान्याचे संचालक रंगनाथ जंगले, उपसरपंच रामराजे जंगले, पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे संदिप जंगले,पानेगांव संस्थेचे अध्यक्ष जालिंदर जंगले, बबनराव जंगले, ग्रामपंचायत सदस्य सतिश जंगले, भाऊसाहेब काकडे, द्वारकानाथ चिंधे, किशोर जंगले,हौशाबापू जंगले, डॉ जयवंत गुडधे,पाराजी गुडधे, एकनाथ जंगले, रमेश जंगले, साहेबराव जंगले, अण्णासाहेब कंक, नामदेव कंक,दिलीप घोलप,हभप गुडधे महाराज, हभप रामचंद्र सोनवणे, हभप पुराणे महाराज, संजय गागरे, पोलीस पाटील बाबासाहेब जंगले, सुनिल चिंधे, योगेश घोलप,सुरज जंगले, जनार्दन गागरे, रमेश गुडधे सुभाष गुडधे, हितेश जंगले, संकेत गुडधे, दिनेश जंगले, बाबासाहेब शेंडगे, विशाल जंगले, चंद्रकांत जंगले, डॉ काकडे, सुरेखा जंगले, सुनिता जंगले,सुनिता सोनवणे, संगिता दौंड, माधुरी जंगले, प्रमिला जंगले,स्वाती चिंधे, शारदा घोलप, दिपाली नवगिरे आदी सह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत