येवला(वेबटीम) गेल्या काही वर्षांपासून येवला कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांदा विक्री साठी तालुक्यातील कष्टकरी शेतकरी मोठ्या कष्टाने कांदा...
येवला(वेबटीम)
गेल्या काही वर्षांपासून येवला कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांदा विक्री साठी तालुक्यातील कष्टकरी शेतकरी मोठ्या कष्टाने कांदा पीक पिकवून विक्री साठी आणतात,घरी उन्हातान्हात बायका पोरांना हाताशी धरून,मोठ्या जिकिरीने कांदा पिकवतात,पण इथं मार्केट ला आलं की निलाव झाल्यावर पहिली समस्या येते ती फाळके लावून कांदे भरण्याची,आणि त्यावरून होणारे वारंवार वाद,अगदी मनमानी कारभाराने एक फाळके भरायचे असल्यास 100 रुपये आकारले जायचे दोन फाळके 200 रुपये आकारले जाते,यावरून शेतकरी व कांदे भरणारे कर्मचारी यांच्यात शाब्दिक वाद व्हायचे,पण अखेर प्रहार जनशक्ती पक्ष तालुकाध्यक्ष अमोल फरताळे,व तालुका संपर्क प्रमुख सचिन पवार शेतकरी संघटनेचे तालुकध्यक्ष हारीभाऊ महाजन यांनी स्वतः मार्केट मध्ये जाऊन परिस्तिथी च वास्तव जाणून घेतले,अन लगेच सोशल मीडियावर व्हिडीओ बनवला की शेतकरी लूट थांबली नाही तर प्रहार जनआंदोलन छेडेल, बस एवढ्याच गोष्टीने कृषी उत्पन्न बाजार समिती व प्रशासन हादरले,आणि लगेच बॅनर बनवून येवला कांदा मार्केट मध्ये लावण्यात आला नेमा प्रमाणे आता तीन चाकी रिक्षा 20 रुपये, छोटा हत्ती 30 रुपये , पिकप 40 रुपये ट्रॅक्टर प्रति फाळके 50 रुपये मूल्य ठरविण्यात आले, आंदोलनाचा इशारा देते वेळी प्रहार चे पदाधिकारी शंकर गायके, वसंत झांबरे, बापूसाहेब शेलार, पांडुरंग शेलार, गणेश लोहकरे, गोविंद पवार, इ. कार्यकर्ते उपस्थित होते.
एकीकडे 2500,ते 3000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकणारा लाल कांदा,आज 400/500रुपय क्विंटल वरती येऊन ठेपला,त्यातच दोन फाळके भरण्यासाठी 200 रुपये शेतकऱ्याला मोजावे लागायचे म्हणजे पन्नास किलो कांद्याची रक्कम क्षणात जायची,आज ती निम्म्यावर आली यातच प्रहारचे यश,आणि शेतकऱ्यांचा पाडवा गोड झाला यात आनंद वाटला.
अमोल फरताळे,तालुकाध्यक्ष प्रहार जनशक्ती येवला
वेळोवेळी शेतकरी समस्या घेऊन यायचे,आणि सांगायचे की तुम्ही प्रहार तर्फे काहीतरी करा,मग शेवटी आक्रमक पवित्रा घ्यावा लागला,आनंद यातच आहे माझ्या गोर गरीब शेतकऱ्यांची होणारी लूट आता नक्कीच थांबेल,त्या बरोबर त्यांचे अश्रूही थांबतील.
सचिन पवार,तालुका संपर्क प्रमुख,प्रहार जनशक्ती पक्ष येवला
आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी प्रहारची तालुक्यातील ठिकाणी आंदोलन फक्त ऐकण्यात आली होती,पण हा शेतकरी लुटी विरोधातील आंदोलन,हे खूप प्रभावी वाटलं,यात प्रत्येक शेतकऱ्याची प्रति ट्रॅक्टर मागे होणारी 100 रुपयांची लूट प्रहार मुळे थांबनार आहे.
माधव तनपुरे,प्रगतिशील शेतकरी आडगाव रेपाळ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत