कोपरगाव शहर पोलीस ठाणे बनले सेल्फी पॉईंट - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव शहर पोलीस ठाणे बनले सेल्फी पॉईंट

कोपरगाव / प्रतिनिधी पोलीस म्हटले की सर्वसामान्यांची अक्षरशः त्रेधातिरपीट उडते. परंतु, कोपरगाव शहर पोलीस ठाणे आता नागरिकांसह तरुणाईला हक्काचे...

कोपरगाव / प्रतिनिधी



पोलीस म्हटले की सर्वसामान्यांची अक्षरशः त्रेधातिरपीट उडते. परंतु, कोपरगाव शहर पोलीस ठाणे आता नागरिकांसह तरुणाईला हक्काचे ठिकाण बनले असून सेल्फी पॉईंट ठरला आहे. येथे नागरिकांनी लोकवर्गणीतून ‘आय लव्ह पोलीस’ थीम साकारली असून, येथे नागरिकांसह तरुणाई सेल्फी काढून पोलिसांप्रती प्रेम व्यक्त करत आहे.



‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदाप्रमाणे पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र तैनात असतात. कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणार्‍यांवर आणि गुन्हे करणार्‍यांवर पोलीस कायदेशीर कारवाईचा फास आवळतात. त्यामुळे नागरिकांच्या मनात पोलिसांविषयी प्रचंड भीती व कुतूहल असते. मात्र, कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या कारभारातून नागरिकांसह तरुणाईच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण केले आहे. याबद्दल नागरिकांनी लोकवर्गणीतून ‘आय लव्ह पोलीस’ थीम साकारत पोलिसांबद्दल प्रेम व्यक्त केले आहे.



 सध्या हा पॉईंट महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुणाई व सर्वसामान्य नागरिकांसाठी सेल्फी पॉईंट बनला आहे. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, उपनिरीक्षक भरत दाते यांसह इतर अधिकारी व कर्मचारी नागरिकांशी सुसंवाद साधून पोलिसांबद्दलची मनातील भीती कमी करत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत