देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्रीराम मंदिर येथे रविवार दिनांक १० एप्रिल रोजी श्र...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्रीराम मंदिर येथे रविवार दिनांक १० एप्रिल रोजी श्रीराम जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला असून या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
देवळाली प्रवरा येथील श्रीराम मंदिरात सकाळी ७ वाजता गंगाजल स्थान त्यानंतर ८ ते ९ या वेळेत श्रीराम पंचायतनास पंचामृताने अभिषेक व सकाळी १० वाजता समाजप्रबोधनकार ह.भ.प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे हरिकीर्तन व त्यानंतर श्रीराम जन्मोत्सव महाआरती व महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
तरी या कार्यक्रमास परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा. असे आवाहन श्रीराम जन्मोत्सव कमिटी व समस्त देवळाली प्रवरा शहरवासीय यांनी केले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत