रणरणत्या उन्हातही आहिल शहेबाज बागवानचा पहला रोजा पूर्ण केला. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

रणरणत्या उन्हातही आहिल शहेबाज बागवानचा पहला रोजा पूर्ण केला.

  देवळाली प्रवरा /प्रतिनिधी  राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा  येथील आहिल शहेबाज बागवान (वय 5) याने रणरणत्या उन्हातही रोजा पूर्ण केला. इस्ल...

 देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 


राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा  येथील आहिल शहेबाज बागवान (वय 5) याने रणरणत्या उन्हातही रोजा पूर्ण केला. इस्लाम धर्मामध्ये पाच महत्वाच्या कर्तव्यांमध्ये रोजा हा महत्वाचा घटक आहे. आहिल याने लहानपणीच अन्न, पाणी वर्ज्य करीत संपूर्ण दिवस रोजाचे पालन केले. कुरआनमध्ये असलले सुरह, हदीसचे वाचन व पठण करणार्‍या आहिलने रोजा पुर्ण केल्याबाबत सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.


        रमजान महिन्यामध्ये भुकेलेले व तहाणने व्याकूळ झालेल्यांची व्यथा समजण्यासाठी मुस्लीम समाज रोजा पूर्ण करतो. रोजानंतर सायंकाळी अल्लाहकड प्रार्थना केली जाते. यंदा उन्हाची तीव्रतेने उच्चांकी ओलांडली असताना दुसरीकडे रमजानचे रोजे सुरू आहेत. आहिल बागवान यान रोजा पूर्ण करताना संपूर्ण दिवस त्याने पाच वेळ नमाज पठण केली व अल्लाहाची प्रार्थना करून संध्याकाळी पावणे सात वाजता  त्यास नविन कपडे व हार गुच्छाने सजवून रोजा सोडण्यासाठी विविध पदार्थ तयार करण्यात आले होते. वडील शहेबाज बागवान व आजोबा मन्सुर बागवान व चिमुकल्या भावंडा  समवेत आपला रोजा सोडला. यादरम्यान कडाक्याचे ऊन त्यामुळे लागणारी तहान व भूक त्याने सहन केली. याबाबत त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.समस्त मुस्लीम बांधवांनी आहिल यास  शुभेच्छा व्यक्त केल्या.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत