बारागाव नांदूर येथील राहील शेखचा रोजा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

बारागाव नांदूर येथील राहील शेखचा रोजा

  राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील राहिल रिजवान शेख (वय ६) याने रणरणत्या उन्हातही रोजा पूर्ण केला. इस्लाम धर्मामध्ये प...

 राहुरी(वेबटीम)

राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील राहिल रिजवान शेख (वय ६) याने रणरणत्या उन्हातही रोजा पूर्ण केला. इस्लाम धर्मामध्ये पाच महत्वाच्या कर्तव्यांमध्ये रोजा हा महत्वाचा घटक आहे. राहिल याने लहानपणीच अन्न, पाणी वर्ज्य करीत संपूर्ण दिवस रोजाचे पालन केले. कुरआनमध्ये असलले सुरह, हदीसचे वाचन व पाठण करणार्‍या राहिलने रोजा पुर्ण केल्याबाबत सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.


रमजान महिन्यामध्ये भुकेलेले व तहाणने व्याकूळ झालेल्यांची व्यथा समजण्यासाठी मुस्लीम समाज रोजा पूर्ण करतो. रोजानंतर सायंकाळी अल्लाहकड प्रार्थना केली जाते. यंदा उन्हाची तीव्रतेने उच्चांकी ओलांडली असताना दुसरीकडे रमजानचे रोजे सुरू आहेत. राहिल शेख यान रोजा पूर्ण केल्यानंतर समस्त मुस्लीम बांधवांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत