ना. आशुतोष काळेंच्या मागणीची उपमुख्यमंत्री पवारांनी घेतली दखल - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ना. आशुतोष काळेंच्या मागणीची उपमुख्यमंत्री पवारांनी घेतली दखल

कोपरगाव(वेबटीम)  श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार य...

कोपरगाव(वेबटीम)



 श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडे कोपरगाव बसस्थानकात व्यापारी संकुल उभारण्यासाठी निधी द्यावा अशी मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेऊन व्यापारी संकुल उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.


राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार हे मागील आठवड्यात कोपरगाव दौऱ्यावर आले असता त्यांनी   महाविकास आघाडी सरकार आशुतोषच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. त्याच सभेत संगमनेर बसस्थानकाच्या धर्तीवर कोपरगाव बसस्थानकात देखील व्यापारी संकुल उभारण्यासाठी निधी मिळावा अशी मागणी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी केली होती. त्या मागणीबाबत उपमुख्यमंत्र्यांनी लवकरच परिवहनमंत्री ना.अनिल परब व परिवहन राज्यमंत्री ना. सतेज पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन कोपरगाव बसस्थानकामध्ये व्यापारी संकुल उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली होती.


दिलेला शब्द पाळणारा नेता अशी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांची राज्याला वेगळी ओळख आहे. त्यामुळे दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी एका आठवड्याच्या आत त्यांनी बसस्थानकामध्ये व्यापारी संकुल उभारण्याची ना.आशुतोष काळेंची मागणी पूर्ण करण्यासाठी मुंबई येथे बैठक घेतली. या बैठकीत बसस्थानक परिसरात असलेल्या रिकाम्या जागेत बसतील एवढे व्यापारी संकुल उभारण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी ना. आशुतोष काळेंना दिली. त्यामुळे कोपरगाव बसस्थानक परिसर लवकरच विकसित होणार आहे. त्याबद्दल ना.आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार, परिवहनमंत्री ना.अनिल परब व परिवहन राज्यमंत्री ना. सतेज पाटील, पर्यावरण राज्यमंत्री ना. संजय बनसोडे आभार मानले आहे.


यावेळी या बैठकीसाठी पर्यावरण राज्यमंत्री ना. संजय बनसोडे, ना.आशुतोष काळे, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितिन गद्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, लातूरचे जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज आदी उपस्थित होते.


      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत