आंबी-देवळाली रस्ता गेला चारच दिवसांत खड्ड्यात ठेकेदाराकडून निकृष्ठ काम; सा. बां. ची डोळेझाक का? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आंबी-देवळाली रस्ता गेला चारच दिवसांत खड्ड्यात ठेकेदाराकडून निकृष्ठ काम; सा. बां. ची डोळेझाक का?

आंबी (संदिप पाळंदे)   राहुरी तालुक्यातील आंबी-देवळाली प्रवरा हा अत्यंत वर्दळीचा रस्ता असून तालुक्याच्या बाजारपेठेशी जोडणारा महत्त्वाचा रस्ता...

आंबी (संदिप पाळंदे) 



 राहुरी तालुक्यातील आंबी-देवळाली प्रवरा हा अत्यंत वर्दळीचा रस्ता असून तालुक्याच्या बाजारपेठेशी जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी सुमारे ५० लाखांचा निधी दिला. या कामाचा ठेका तालुक्यातील एका नामवंत ठेकेदाराला दिला. मात्र या ठेकेदाराने सदर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ठ प्रतीचे केल्याने अवघ्या चारच दिवसात या रस्त्यावर खड्डे पडायला सुरुवात झाली आहे.



       आंबी-देवळाली प्रवरा रस्ता मोठ्या खराब झाला होता. आंबी व अंमळनेर येथील शिवसैनिक व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी खा. लोखंडे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून रस्त्यासाठी तब्बल अर्धा कोट रुपये निधी मंजूर करून आणला. जानेवारी महिन्यात रस्त्याचे उद्घाटन झाले. मात्र तेव्हापासून रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ठ व संथगतीने सुरू होते. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी 'अर्थ'पूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसून येते आहे.  दरम्यान शिवसेनेचे आंबी शाखाध्यक्ष विठ्ठल एस. कोळसे यांच्याकडे माहिती घेतली असता रस्त्याच्या निकृष्ठ कामाबद्दल खा. लोखंडे यांच्या कानावर ही बाब घालणार असून त्यानंतर ठेकेदाराची कानउघाडणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


उद्घाटनाचा 'तो' फलक गायब?

"जानेवारी महिन्यात खा. सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते रस्त्याचे थाटात उद्घाटन झाले. त्यासंबंधीच्या बातम्या वृत्तपत्रांत छापून आल्या. मात्र खा. लोखंडे पाठमोरे होताच उद्घाटनाचा फलक गायब झाला. ग्रामपंचायतीच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याकडे विचारणा केली असता तो फलक ठेकेदाराने काढून नेला असून काम पूर्ण झाल्यावर पुन्हा लावणार असल्याचे सांगितले." 



"आंबी-देवळाली प्रवरा रस्त्याच्या निकृष्ठ कामासंदर्भात आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून माहिती मिळाली. सदर निकृष्ठ कामाची गुणनियंत्रक पथकाकडून चौकशी करावी. त्याशिवाय ठेकेदारास बिल अदा करू नये. यामध्ये दोशी असणाऱ्यांविरोधात कडक कारवाही करावी. अन्यथा भारत मुक्ती मोर्चा संघटनेच्या वतीने संवैधानिक मार्गाने आंदोलन करण्यात येईल."

- संजय संसारे (तालुकाध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत