कोपरगाव नगरपालिकेत दिव्यांग बांधवांची बैठक उत्साहात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव नगरपालिकेत दिव्यांग बांधवांची बैठक उत्साहात

कोपरगाव / प्रतिनिधी नगरपरिषद हद्दीतील सर्वपक्षीय दिव्यांग पदाधिकाऱ्यांची मुख्याधिकाऱ्यांसोबत बैठक बुधवारी (ता.१२) मोठ्या उत्साहात संपन्न झाल...

कोपरगाव / प्रतिनिधी



नगरपरिषद हद्दीतील सर्वपक्षीय दिव्यांग पदाधिकाऱ्यांची मुख्याधिकाऱ्यांसोबत बैठक बुधवारी (ता.१२) मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा करुन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.


कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी नगरपरिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वपक्षीय दिव्यांग पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यात अतिशय समाधानकारक चर्चा होऊन व  दिव्यांगाच्या विविध योजना सांगितल्या. नगरपरिषद हद्दीतील दिव्यांग बंधू-भगिनींचे प्रश्न अतिशय उत्तमप्रकारे सोडविण्यासाठी कायमस्वरूपी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची एक शहर समिती करण्याचे मुख्याधिकारी गोसावी यांनी सांगितले. दिव्यांग पदाधिकार्‍यांच्यावतीने मुख्याधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वीरेन बोरावके, राजेंद्र वाकचौरे, योगेश गंगवाल,  मनसे दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष बाळासाहेब लांडे, उपजिल्हाध्यक्ष शिवसेना दिव्यांग सेल स्वप्नील कडू, शहराध्यक्ष भाजप दिव्यांग सेल जयवंत मरसाळे,  कोपरगाव अपंग संघटना अध्यक्ष प्रवीण भुजाडे,  प्रहार दिव्यांग संघटनेचे शहराध्यक्ष संदीप कवडे, प्रहार दिव्यांग संघटना शहर सचिव अफजल पठाण, शहराध्यक्ष शिवसेना दिव्यांग सेल संजय घाडगे, भाजप दिव्यांग सेल उपशहराध्यक्ष प्रशांत चिमणपुरे, आदित्य निकुंभ आदी सर्वपक्षीय दिव्यांग पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत