सात्रळ(वेबटीम) सात्रळ, सोनगाव, धानोरे पंचक्रोशीतील धानोरे गावचे ग्रामदैवत धनेश्वर महाराज पिंड , प्रतिष्ठापना सोहळा कार्यक्रम मंगळवार दिनांक ...
सात्रळ(वेबटीम)
सात्रळ, सोनगाव, धानोरे पंचक्रोशीतील धानोरे गावचे ग्रामदैवत धनेश्वर महाराज पिंड , प्रतिष्ठापना सोहळा कार्यक्रम मंगळवार दिनांक १२एप्रिल ते शुक्रवार दि. १५ एप्रिल या कालावधीत संपन्न होत आहे. वेदशास्त्रसंपन्न ज्योतिष विशारद प्रमोद सखाराम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, हा कार्यक्रम संपन्न होत आहे.
या कालावधीत मंगळवार दि. १२ रोजी , सकाळी आठ वाजेपासून पुण्याहवाचन ,मातृका पूजन ,योगिनीपीठ ,सर्वतोभद्र नवग्रह ,ईशान्य देवता पीठ ,स्थान पूजन ,गोपूजन ,नवग्रह हवन, जलदित्यावास
बुधवार दि. १३ रोजी , यजमान शांतीपाठ देवतापूजन ,हावन, शमादियावास, धान्यदिवास, स्नापन कर्म पूर्ण होईल.गुरुवार दि. १४ रोजी , यजमान शांतीपाठ, देवता पूजन,मुर्तीसंस्कार, सकाळी ९ वाजता चनेगाव शिव ते धानोरे घाट अशी मूर्तीची मिरवणूक होईल त्यानंतर बलिदान पूर्णाहुती आणि आरती होईल.शुक्रवार दि. १५एप्रिल रोजी सकाळीसमाज प्रबोधनकार ह भ प .निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन होईल व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल .
तरी धानोरे सह पंचक्रोशीतील भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन धनेश्वर महाराज जीर्णोद्धार समिती धानोरे व समस्त ग्रामस्थ धानोरे यांचे वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत