राहुरी/वेबटीम:- एक्सपर्ट ॲकॅडमी अहमदनगर या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय ॲबॅकस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राहुरी तालुक्य...
राहुरी/वेबटीम:-
एक्सपर्ट ॲकॅडमी अहमदनगर या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय ॲबॅकस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राहुरी तालुक्यातील वळण येथील कू. जिज्ञासा विजय मकासरे हिने सेकंडरी फोर्थ लेव्हलमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवला तर कु. आर्या विजय मकासरे हिने प्रायमरी थर्ड लेव्हलमध्ये राज्यात द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले.
त्यांच्या या यशाबद्दल जि प प्राथमिक शाळा वळण येथील सेवकवृंद व छत्रपती शिवाजी विद्यालय करंजगाव येथील सेवकवृंद यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत