सात्रळ/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील रामपूर हे प्रवरा नदीतीरावर निसर्गरम्य सानिध्यात वसलेले गाव. या गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अखंडप...
सात्रळ/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील रामपूर हे प्रवरा नदीतीरावर निसर्गरम्य सानिध्यात वसलेले गाव. या गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अखंडपणे चालू असलेली लोककला व ग्रामीण संस्कृतीचा वारसा असलेला पारंपरिक दशावतारी खेळ, अर्थात वेगवेगळ्या देव देवतांची व दानवांची मुखवटे धारण करून सनई ताफ्याच्या तालावर चालणारा आखडीचा खेळ , ग्रामदैवत दक्षिणमुखी हनुमंत रायाच्या मंदिरासमोर रात्रभर आबालवृद्ध व तरुणवर्ग ,महिला ,ग्रामस्थांच्या उपस्थितीत मुखवटे नाचवून साजरा केला. लोककला ,ग्रामीण संस्कृती आजही प्रगत विज्ञान, तंत्रज्ञानाचे युग असुन देखील रामपूर व नदीकाठची इतर काही गावांमध्ये ही परंपरा जोपासली जाते व सामाजिक , सांस्कृतिक ऐक्याचे दर्शन यात्रेनिमित्त घडले. गावचे ग्रामदैवत इतर देवतांची यथोचित पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून देवदेवतांचे ऋणव्यक्त करण्याची वर्षांनुवर्षे चालत आलेली ही परंपरा नववर्षाचे स्वागत करून केली. नोकरी ,व्यवसाय अथवा इतर कारणांस्तव गावाबाहेर वास्तव्यास असलेली ग्रामस्थ आवर्जून गुढी पाडव्याला दशावतारी/आखाडी खेळ पाहण्यासाठी सहकुटुंब गावामध्ये येऊन हजेरी लावतात. सायंकाळी प्रथमतः सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन तकतराव व ग्रामदैवत व श्री गणेशाचे पूजन करून दशावतारी खेळ निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी तसेच गावावर कोणतेही अरिष्टय ,रोगराई येऊ नये म्हणून विनवणी वजा आराधना सवाद्य सनई ताफ्याच्या तालावर श्रीफळ वाढवून केली जाते. आखाडीत रामायण, महाभारत ,काशिखंड , श्री विष्णुदेवाचे दहा अवतार अशी पात्रे खेळले गेले, काही पात्रे रंगरेघोटी करून मढवलेले मुखवटे व काही तसेच मुखवट्याविना असतात , मध्येच संवाद ,पदे ,तोड करून खेळणाराना प्रोत्साहन दिले जाते. असा हा आखडीचा खेळ रात्रभर चालला ,पहाटे नृसिंह अवतार ,देवी मातेचा मुखवटा संपूर्ण गावभर खेळून सुवासिनी महिलांनी भावपूर्ण पूजा अर्चा करून श्रीफळ अर्पण केले. आखाडी यशस्वी होण्यासाठी प्रमुख सूत्रधार राज्य आदर्श शिक्षक श्री अनिल लोखंडे सर , ह भ प बाळासाहेब खळदकर ,मुकुंद क्षीरसागर, श्री आप्पासाहेब नालकर यांनी विविध संबंधित सोंगांचे संवाद ,पदे सवाद्य गायली.उपसरपंच श्री राहुल पाटील साबळे , बापू सरोदे ,भाऊसाहेब मोरे , दिपक लोखंडे , ज्ञानदेव मोरे , शिवाजी साबळे ,मच्छीन्द्र मोरे ,ज्ञानदेव सरोदे , अरुण साबळे ,भागवत खळदकर ,मिलिंद क्षीरसागर ,अरुण भोसले ,धनंजय लोखंडे ,रावसाहेब मोरे ,भगीरथ नालकर ,साहेबराव नालकर ,रमेश डोखे ,रमेश बर्डे ,नामु बर्डे ,भागवत वर्पे ,चांगदेव नालकर यांनी विशेष परिश्रम घेतले , आखाडीतील महत्वाचे असलेले सनई वाजंत्री ताफ्यावाले रतनभाऊ भोसले ,उत्तम भोसले , दादूराव लोखंडे ,कमलाकर कदम इतर पाहुणे कलाकार आदींनी यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य केले .
Very Nice Thanks !! keep it up ।।
उत्तर द्याहटवाThankyou for the update.Very nice.Good job.
उत्तर द्याहटवा