उंबरे सोसायटीत कांटे की टक्कर ; वाचा कोण कुणाकडून रिंगणात ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

उंबरे सोसायटीत कांटे की टक्कर ; वाचा कोण कुणाकडून रिंगणात !

राहुरी : राहुल पाटील     उंबरे सोसायटीच्या अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी अनेकांनी आपले अर्ज माघारी घेतले. त्यामुळे दुरंगी लढतीचे चित्र स्पष...

राहुरी : राहुल पाटील    


उंबरे सोसायटीच्या अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी अनेकांनी आपले अर्ज माघारी घेतले. त्यामुळे दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, गावात निवडणुकीचा धुराळा उडण्यास खर्‍याअर्थाने सुरूवात झाली आहे. सत्ताधारी जनसेवा मंडळाने दिग्गज उमेदवार रिंगणात उतरवले आहेत, तसेच भटक्या विमुक्तची जागा बिनविरोध मिळवत खाते उघडले आहे, तर विरोधकांनीही उवर्रीत 12 पैकी 12 जागा जिंकण्यासाठी  जिद्दीने लढण्याचा निर्णय घेतल्याने निवडणुकीत प्रतिष्ठा व  चुरस वाढली आहे.

सत्ताधारी जनसेवा मंडळाकडून जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक, कारखान्याचे विद्यमान चेअरमन नामदेव ढोकणे, कारखान्याचे माजी संचालक सुनीलभाऊ आडसुरे, जेष्ठ नेते गोरखभाऊ ढोकणे आदी नेतृत्व करत आहेत. तर गणराज शेतकरी मंडळाकडून तनपुरे कारखान्याचे माजी संचालक साहेबराव दुशिंग, इंजि.नवनाथ पाटील ढोकणे, कारभारी ढोकणे, गंगाधरदादा ढोकणे, इंजि गोरक दुशिंग, युवानेते बाबासाहेब ढोकणे, संतोषराव ढोकणे, मच्छिंद्र पाटील, अशोक ढोकणे आदी समविचारी लोक एकत्र आले आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी मंडळांने दिग्गज उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर विरोधी गणराज मंडळाने सर्व तरूण चेहरे पुढे आणले आहेत. त्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार असल्याने या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष असणार आहे.       अर्ज माघारीवेळी गणराज मंडळकडून  पार्टीहितासाठी आणि मोठ्या मनाने दुसऱ्याला संधी देण्याकरिता कारभारी ढोकणे, परशराम पाटील, मच्छिंद्र पाटील,  विठ्ठल पाटील ढोकणे, गीताराम ढोकणे, कैलास दुशिंग, नवनाथ दुशिंग,तर जनसेवाकडून भास्कर ढोकणे, रघुनाथ ढोकणे, संतोष ढोकणे,बाबासाहेब सासवडे, उत्तम जगनाथ,पिनू पटारे, लंका रवींद्र ढोकणे आदींनी माघार घेतली.
जनसेवा मंडळाचे जनरल आठ जागांवरील उमेदवार पुढील प्रमाणेः शिवाजी जगन्नाथ आडसुरे, एकनाथ नारायण ढोकणे, सोपान नाथा दुशिंग, भाऊसाहेब नामदेव तांबे, नानाभाऊ भानुदास ढोकणे, लक्ष्मण मुरलीधर तोडमल, दत्तात्रय राधाकिसन ढोकणे, शिवाजी भाऊसाहेब ढोकणे.
गणराज शेतकरी मंडळ ः सुरेश किसन ढोकणे, दत्तात्रय एकनाथ ढोकणे, चांगदेव ज्ञानदेव ढोकणे, राजेंद्र विश्वनाथ दुशिंग, शहाराम भाऊसाहेब आलवणे, नामदेव भाऊसाहेब भापकर, दत्तात्रय निवृत्ती ढोकणे, मच्छिंद्र नारायण ढोकणे.
महिला जनसेवा मंडळ ः कल्पना जालिंदर ढोकणे, गयाबाई भाऊसाहेब दुशिंग यांच्याविरोधात गणराज मंडळाकडून भामाबाई रामनाथ दारकुंडे, मिराबाई लक्ष्मण काळे अशी लढत रंगणार आहे. या चारपैकी दोन महिला विजयी होतील.
इतर मागासवर्ग प्रवर्गातून जनसेवा मंडळाकडून संदीप केशवराव ढोकणे यांच्याविरोधात विलासराव रघुनाथ ढोकणे यांच्यात सरळ सरळ लढत होणार आहे.
अनुसुचित जाती जमातीमधून जनसेवेकडून अशोक पंडीत हे पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. तर त्यांच्याविरोधात त्यांचे पुतणे दीपक पंडीत हे आखाड्यात उतरले आहेत. ही सख्या काका-पुतण्यातील लढत लक्ष्यवेधी ठरणार आहे.
जनसेवा मंडळाने भाऊसाहेब बापू बाचकर यांच्या रुपाने खाते उघडले असून, आता 12 जागांसाठी 15 तारखेला निवडणूक होऊन त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.                                     
गरुड थांबल्याने 'ते' मंडळ घेणार 'गरुडभरारी '!                        ग्रामपंचायतीला दोन वेळा दगाफटका होऊन पराभूत झालेले विकास गरुड यांनी सोसायटीला अपक्ष अर्ज भरला होता, त्यामुळे दोन्ही मंडळ चिंतेत होती, या अर्जामुळे संभ्रम तयार होऊन पार्टीला मोठा धोका निर्माण झाला होता, यात काही उमेदवारांना पराभवही पहावा लागला असता,मात्र अर्ज माघारीवेळी गरुड यांनी मंडळांच्या श्रेष्ठींच्या शब्दाचा मान ठेवत अर्ज माघारी घेतला, त्यामुळे आता गरुड ज्यांच्यामागे ती मते त्या पार्टीला पडतील, असे चित्र तयार झाले आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत