राहुरी फॅक्टरी(वेबटीम) देवळाली प्रवरा येथील प्रगतशील शेतकरी तथा अक्षय स्टीलचे सर्वेसर्वा रवींद्र आण्णासाहेब ढुस यांची सुकन्या चि.सौ.का. डॉ....
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
देवळाली प्रवरा येथील प्रगतशील शेतकरी तथा अक्षय स्टीलचे सर्वेसर्वा रवींद्र आण्णासाहेब ढुस यांची सुकन्या चि.सौ.का. डॉ.कोमल व श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज येथील दत्तात्रय राजाराम नांदगुडे यांचे चिरंजीव डॉ प्रदीप या उभयतांचा विवाह शुक्रवारी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
रम्य सायंकाळी, निर्सगरम्य वातावरणात राहुरी येथील शुभकीर्ती लॉन्स येथे हा विवाह संपन्न झाला. वैद्यकीय क्षेत्रातील या नवदांपत्याना शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी संत तुकाराम महाराज देवस्थान नेवासा येथील मठाधिपती उद्धव महाराज मंडलिक यांनी भेट देऊन वधू वरांना शुभाशीर्वाद दिले.
या विवाह सोहळ्यास माजी आ.चंद्रशेखर कदम, भाजपचे प्रांत सदस्य आसाराम ढुस, साईदीप हॉस्पिटलचे डॉ.दीपक सिद्धीवरम व त्यांचे संपूर्ण कुटुंब, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब गिरमकर, राहुरी तालुका दूध संघाचे चेअरमन तान्हाजीराव धसाळ, डॉ.तनपुरे कारखान्याचे उपाध्यक्ष दत्तात्रय ढुस, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड, साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, आदर्श नागरी पटसंस्थेचे चेअरमन आण्णासाहेब चोथे, सतीश तनपुरे, तनपुरे कारखान्याचे संचालक अशोक खुरुद, मच्छीन्द्र तांबे, , कोपरगावचे माजी नगरसेवक वैभव आढाव, देवळाली व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश वाळुंज, देवळाली सोसायटीचे चेअरमन राजेंद्र ढुस, प्रहार जनशक्तीचे आप्पासाहेब ढुस, वंचितचे संतोष चोळके, शिवसेनेचे भागवत मुंगसे, सुनील कराळे,आझाद मित्र मंडळाचे संदीप कदम तसेच देवळाली प्रवरा नगरपालिकेचे आजी-माजी पदाधिकारी-अधिकारी, देवळाली सोसायटीचे आजी-माजी संचालक , अजनुज ग्रामपंचायत आजी-माजी सदस्य, सोसायटीचे आजी-माजी पदाधिकारी, तसेच सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, कृषी, उद्योग, क्रीडा ,राजकीय, साहित्य, पत्रकारिता, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर तसेच साई प्रतिष्ठानचे सदस्य व साईदीप हॉस्पिटल तसेच देवळाली, टाकळीमिया, वांबोरी येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मंडळी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत