रोजेदार मुस्लिम बांधवानी रॅली मधील भीम सैनिकांना पाजले सरबत! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

रोजेदार मुस्लिम बांधवानी रॅली मधील भीम सैनिकांना पाजले सरबत!

राहूरी फॅक्टरी(वेबटीम):- विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीनिमित्त राहूरी फॅक्टरी येथे निघालेल्या प्रबोधन रॅली मधील भीम सैनिकांना मशीद ...

राहूरी फॅक्टरी(वेबटीम):-


विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीनिमित्त राहूरी फॅक्टरी येथे निघालेल्या प्रबोधन रॅली मधील भीम सैनिकांना मशीद मध्ये बोलावून थंडगार सरबत पाजून सामाजिक एकोपा जपण्याचे काम केले आहे.

       डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्वत्र उत्स्फूर्तपणे साजरी करण्यात येत आली या जयंती निमित्ताने ठिकठिकाणी निघालेल्या मिरवणुकी निघाल्या.राहूरी फॅक्टरी येथे ही अशीच प्रबोधन रॅलीचे आयोजन करण्यात आले असताना येथील मुस्लिम समाजातील तरुणांनी जामा मस्जिद च्या प्रांगणात रॅलीतील भीम सैनिकांना आमंत्रित करून स्वतःला रोजे असतांना थंडगार सरबत पाजून सामाजिक ऐक्याची परंपरा जपली आहे.

     यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात,प्रहार चे आप्पासाहेब ढुस,शिवाजी घाडगे तैनुरभाई पठाण,रफीक शेख, बाळासाहेब पाडागळे यांनी सामाजिक ऐक्याची परंपरा जपणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक करून सर्व तरुणांचे आभार मानले.

        जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, पत्रकार रफिक शेख, शिवचरित्रकार हसन सय्यद, शिवाजी घाडगे, डॉ. फारुख सय्यद, आप्पासाहेब ढुस, बाळासाहेब पडागळे, अतुल त्रिभुवन, नेल्सन कदम, आशिष संसारे, किरण पंडित, याकूब शेख, तैनूर पठाण, मुस्ताक पठाण, शाहबाज पठाण, मोसीन शेख, रईस शेख, अकिल शेख, जाकीर शेख, शाहबाज सय्यद, आरीफ शेख, कय्युम शेख, रफिक शेख, शफी शेख, जुबेर कुरेशी, इकबाल मन्सूरी, फिरोज शेख, अस्लम शेख, मेहबूब शेख, ख्वाजा शेख, फारूक पटेल, रफिक सय्यद, अहेमद शेख, दादा पेंटर, अजीम पेंटर, असिफ शेख, टिपू शेख, तोफिक सय्यद, तौसिफ शेख, मैनूद्दीन शेख, सोहेल शेख, परवेज पठाण, सलीम शेख, उसामा शेख, साकीब शेख, शादाब शेख, अरबाज सय्यद आदींसह सर्व धर्मीय तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत