राहुरी(वेबटीम) राहुरी येथील डॉ.तनपुरे साखर कारखाना कामगार युनियनचे अध्यक्ष इंद्रभान भाऊसाहेब पेरणे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला अ...
राहुरी(वेबटीम)
राहुरी येथील डॉ.तनपुरे साखर कारखाना कामगार युनियनचे अध्यक्ष इंद्रभान भाऊसाहेब पेरणे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून पेरणे यांच्या राजीनाम्यामुळे कामगार वर्गात एकच खळबळ उडाली आहे.
डॉ.तनपुरे कारखाना सध्या खा.सुजय विखे यांच्या अधिपत्याखालील संचालक मंडळाच्या ताब्यात असून या कारखान्याच्या साखर कामगार युनियन अध्यक्षपदी इंद्रभान पेरणे यांची गेल्या काही महिन्यांपूर्वी निवड करण्यात आली होती. कामगारांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी पेरणे हे नेहमी सडेतोड भूमिका घेत असत.
आज पेरणे यांनी आपला राजीनामा राष्ट्रीय साखर कामगार युनियन सेक्रेटरी यांच्याकडे पाठविला आहे. या राजीनामा पत्रात पेरणे यांनी मी माझ्या वयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असून पदास न्याय देण्यास असमर्थ असल्याकारणाने अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याचे म्हंटले आहे.
दरम्यान पेरणे यांनी युनियन अध्यक्ष पदाचा राजीनामा का दिला? कोणी द्यायला लावला का? की स्वतः दिला? असे अनेक प्रश्न कामगार वर्गातून उपस्थित होत आहे.
उद्या सोमवारी सकाळी इंद्रभान पेरणे माध्यमांसमवेत संवाद साधून आपली भूमिका मांडणार असल्याचे समजते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत