मांजरी येथे चंद्रगिरी महाराज यात्रा उत्सवास प्रारंभ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मांजरी येथे चंद्रगिरी महाराज यात्रा उत्सवास प्रारंभ

राहुरी(वेबटीम) दोन वर्षांपूर्वी कोरोणा महामारिमुळे खंडित असलेल्या चंद्रगिरी महाराजांचा यात्रा उत्सव यावर्षी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे...

राहुरी(वेबटीम)



दोन वर्षांपूर्वी कोरोणा महामारिमुळे खंडित असलेल्या चंद्रगिरी महाराजांचा यात्रा उत्सव यावर्षी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे मांजरी पानेगावचे गावचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेले चंद्रगिरी महाराजांचा यात्रा उत्सव चैत्र पौर्णिमेला सुरू होतो आणि तीन दिवस चालू असतो.



   यात्रेच्या दिवशी पहाटे गंगा नदीवरून आणलेल्या कावडीने नवयुवक जलाभिषेक करतात जलाभिषेक पहिला मान गावातील तेली समाजालाअसून आंबील आरतीचा मान पानेगाव चे जंगले यांना आहे पूर्वीची आख्यायिका अशी आहे की मुळा नदीच्या काठावर चंद्रगिरी महाराज भक्ताच्या स्वप्नात जाऊन बोलले की मी नदीच्या काठावर आहे मला मामा भाषांची बैलजोडीत मला इथून घेऊन जा.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच चैत्र पौर्णिमेला चंद्रगिरी महाराजांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मांजरी याठिकाणी करण्यात आला त्यानंतर दरवर्षी चैत्र पौर्णिमेला या ठिकाणी उत्सव साजरा करण्यात येत असतो.

  यात्रेच्या दिवशी या ठिकाणी जिल्ह्यातून तसेच अनेक ठिकाणाहून नवसपूर्तीसाठी भाविक भक्तांची गर्दी झालेली दिसते नवसपूर्तीसाठी येथे शेरणी गुळाची वाटप केली जात असते. यात्रेच्या दिवशी म्हणजे संध्याकाळी रथा वरून मिरवणूक काढली जाते या मिरवणुकीच्या वेळेस पानेगाव मांजरी या दोन्ही गावच्या बाजूने मुळा नदी तटावर फटाक्यांची आतषबाजी पाहावयास मिळते आतशबजी पाहण्यासाठी येथील परिसरातील लाखो भाविक येथे जमा होत असतात.

  यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा हंगामा तसेच  बैलगाड्यांच्या शर्यती येथे साजरी करण्यात येतात कुस्त्यांच्या हागाम्या साठी जिल्ह्यातून तसेच राज्यातून नामवंत मल्ल येथे येत असतात. तसेच बैलगाड्यांच्या शर्यती साठी हे राज्यातून टांगेवाली येत असतात.

तिसऱ्या दिवशी म्हणजे रात्रीच्या शेवटच्या दिवशी महिला यांची खरेदीसाठी भावी गर्दी झालेली असते यावेळी पोलिस तसेच गावातील यात्रा कमिटीकडून महिलांना तसेच इतरांना कुणाला त्रास होऊ नये म्हणू सुरक्षेची काळजी घेतली जाते

 मांजरी पानेगाव या दोन्ही गावांमध्ये कुठल्याही प्रकारे छत्री तसेच दुमजली  इमारत तसेच पलंग गाधीचा वापर केला जात नाही यागोष्टी चंद्रगिरी महाराजांना चालत नाही श्रद्धेपोटी गावांमध्ये वरील गोष्टींचा वापर केला जात नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत