डाॅ बाबासाहेब आंबेडकर स्मारक बारागाव नांदुर येथे वृक्षारोपण कार्यक्रम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

डाॅ बाबासाहेब आंबेडकर स्मारक बारागाव नांदुर येथे वृक्षारोपण कार्यक्रम

  राहुरी(वेबटीम) डाॅ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे तर्फे सामाजिक समता सप्ताह चा समारोप कार्यक्रम बारागाव नांदुर ...

 राहुरी(वेबटीम)



डाॅ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे तर्फे सामाजिक समता सप्ताह चा समारोप कार्यक्रम बारागाव नांदुर येथील डाॅ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे वृक्षारोपण व ग्राम स्वच्छता  करून करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जि.प.सदस्य  श्री धनराज शिवाजीराजे गाडे पाटिल, कैलास पवार,गौतम पवार,  अतुलभाऊ पवार, अभिषेक पवार, विकास भाऊ तारू, संदिप पवार, रमेश देशमुख, सागर पवार , अजय पवार, आकाश पवार, सनी भाई तसेच नागरिक उपस्थित होते. बार्टीचे पिरजादे एजाज  यांनी स्वच्छतेचा संदेश देत स्मारक परिसरात स्वच्छेने वृक्ष देऊन या स्मारक परिसरात पुढील काळात विविध समाजपयोगी कार्यक्रम घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. 

  बार्टी तर्फे 7 एप्रिल ते 16 एप्रिल तर्फे या सप्ताह काळात विविध उपक्रम राबवुन डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात आला. विशेषतः विद्यार्थी, महिला , युवक युवती ना रोजगार उपलब्ध व्हावा, शासकीय योजनांची माहिती व्हावी तसेच डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वांनी आत्मसात करावे यासाठी व्याख्यान, मेळावे आयोजित केले. तसेच अभिवादन कार्यक्रम , चित्रकला स्पर्धेचे ही आयोजन करण्यात आले होते .

    सामाजिक  समता सप्ताह साजरा करण्यासाठी    समाजकल्याण  सहाय्यक आयुक्त मा.श्री.राधाकिसन देवढे साहेब   समतादूत विभाग प्रमुख तथा उपायुक्त उमेश सोनवणे , प्रकल्प व्यवस्थापक नितीन सहारे सर तसेच बार्टीचे अहमदनगर जिल्हा समतादूत प्रकल्प अधिकारी मा श्री दिलावर सय्यद सर आदींचे मार्गदर्शन समतादूत यांना मिळाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत