राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील दत्तनगर परिसरात नवतरुण ग्रुपच्यावतीने श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील दत्तनगर परिसरात नवतरुण ग्रुपच्यावतीने श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. सर्वधर्म समभावचा नारा देत नवतरुण ग्रुपचे अध्यक्ष किरण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नवतरुण ग्रुपच्या वतीने हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी चैतन्य उद्योगसमूहाचे अध्यक्ष गणेशजी भांड, दि राहुरी अर्बन निधीचे चेअरमन रामचंद्र काळे, आरपीआय उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात,माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, माजी नगरसेवक आदिनाथ कराळे, सचिन ढुस,आझाद मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप कदम, युवा उद्योजक सचिन कोठुळे, रामेश्वर तोडमल, आप्पासाहेब कोहकडे, माजी नगरसेविका सुजाता कदम, बाळासाहेब सोनवणे,प्रहारच्या राहुरी फॅक्टरी महिला शहराध्यक्षा रजनी कांबळे,अनिल दहिवाळ, दत्तू लहारे, प्रशांत विश्वासराव, मारुती मोरे, प्रशांत सूर्यवंशी आदींसह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी नवतरुण ग्रुप दत्तनगरचे अध्यक्ष किरण चव्हाण, उपाध्यक्ष आकाश गायकवाड,सचिव सौरभ शिंदे, ऋतिक नवले, शुभम नवले, अमोल ढोकणे, प्रशांत ढोकणे,हरीचंद्र साहेब,वैभव राऊत,ज्ञानेश्वर तिडके,पत्रकार राजेंद्र साळवे, अक्षय दहिवाळ, विकास शेकडे,विनोद साळुंखे, शुभम वासकर,संदीप गायकवाड आदींसह नवतरुण ग्रुपचे सर्व सदस्य आदींनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत