सात्रळ/वेबटीम:- पंचक्रोशीचे आराध्य दैवत श्री संत कृष्णाजी बाबा महाराज देवस्थान आयोजित बाराव्या वार्षिक सप्ताहास रविवारपासून मोठ्या उत्साहात...
सात्रळ/वेबटीम:-
पंचक्रोशीचे आराध्य दैवत श्री संत कृष्णाजी बाबा महाराज देवस्थान आयोजित बाराव्या वार्षिक सप्ताहास रविवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. हे सप्ताहचे बारावे वर्ष असल्यामुळे सप्ताहाच्या तपपूर्ती निमित्त महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांचा कीर्तन महोत्सव आयोजित केला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.या सप्ताहानिमित्त पहाटे भजन काकडा ,दश सहस्रनाम, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, हरिपाठ, अखंड वीणावादन व संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे. किर्तन संपल्यानंतर सर्वांसाठी अन्नदानाची सोय अनेक दात्यांनी केली आहे.या सप्ताहकाळात ह-भ-प हर्षद महाराज भागवत, रुपेश नाईकवाडे, कु.प्रतिभाताई शेळके, जयश्रीताई तिकांडे, ज्ञानेश्वर महाराज तांबे, गणेश महाराज वाघमारे, मोनिकाताई मयूर येवले धामोडेकर यांची कीर्तन सेवा आयोजित केली असून, काल्याचे किर्तन शिवचरित्रकार संतोष महाराज पवार, शेवगाव यांचे होणार आहे*
सप्ताहाचे व्यासपीठ चालक ह.भ.प. वासुदेव महाराज शास्त्री लोंढे व नामदेव महाराज अंत्रे आहेत. गायक सोपान दिवे, गणेश गीते व मृदंगाचार्य भारत नरोडे यांची सप्ताह काळात संगीत साथ लाभणार आहे.ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायणासाठी जवळपास शंभर वाचक यावेळी वाचनासाठी बसणार आहेत.सप्ताहकाळात अनेक अन्नदाते यांनी नाश्ता, दुपारची व संध्याकाळची पंगत आयोजित केली आहे. तसेच अनेकांनी कीर्तनकार यांची सेवा घेतली आहे.
श्री संत कृष्णाजी बाबांचा सप्ताह हा जिल्ह्यामध्ये प्रसिद्धीस प्राप्त झाला आहे. यापूर्वी राज्यातील अनेक थोर कीर्तनकारांची कीर्तन सेवा तसेच कथा आयोजित केल्या आहेत. या वर्षी सप्ताहास बारा वर्षे पूर्ण होत असल्याने ग्रामस्थ,भजनी मंडळ व तरुण मंडळ यांच्यात विशेष उत्साही वातावरण आहे. या सर्व धार्मिक कार्यक्रमास परिसरातील सर्व भाविक, भक्त ,माता, भगिनी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री संत कृष्णाजी बाबा देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत