राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील चिंचाळे येथे गुरुवारी दुपारी राहात्या छपराला आग लागुन एका वृध्द महिलेचा मृत्यु झाला. या कुटूंबाची भेट घे...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील चिंचाळे येथे गुरुवारी दुपारी राहात्या छपराला आग लागुन एका वृध्द महिलेचा मृत्यु झाला. या कुटूंबाची भेट घेऊन राज्यमंत्री ना.तनपुरे यांनी सांत्वन केले.
चिंचाळे येथील भाऊ शिवराम पारधे हा आपल्या आई ,पत्नी, मुलासह रहात असतांना इतर सर्व शेतात कामाला गेले असता आई एकटीच घरी असतांना दुपारी अचानक रहात्या छपराला आग लागल्याने वृध्द आई अनुसया शिवराम पारधे (वय 78) हिचा भाजुन मृत्यु झाला आहे. पारधे यांचे घर शेतात दुरवर असल्याने मदतीसाठी प्रयत्न करुन उपयोग झाला नाही. आगीचे प्रमाण जास्त असल्याने सदर महिलेचा आगीतच मृत्यु झाला. पोलीस पंचनामा नंतर शवविच्छेदन करुन अंतिमसंस्कार करण्यात आले. सदरची घटना समजताच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज सकाळी चिंचाळे येथील पारधे कुटुंबाची भेट घेवुन सांत्वन केले.
यावेळी मंत्री तनपुरे यांनी तहसिलदार तसेच तलाठी ,ग्रामसेवक, यांना पंचनामा करुन पुढील कारवाईचे आदेश दिलेले आहेत. लवकरच शासन दरबारी मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे तनपुरे यांनी सांगितले.
यावेळी तहसिलदार फसियोद्दीन शेख ,तलाठी गवारी भाऊसाहेब ,ग्रमसेवक करपे भाऊसाहेब उपसरपंच घमाजी जाधव राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष धिरज पानसंबळ,भारतशेठ भुजाडी ,संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष कोंडीराम वडितके ,ग्रामपंचायत सदस्य बापुसाहेब गडधे ,सतिष बाचकर,बाळासाहेब गडधे,सखाराम तिखुले,एकनाथ जाधव,दामु काळे,कामगार पोलीस पाटील भागवत टेंगळे,राष्ट्रवादीचे शाखा अध्यक्ष ऋषिकेश टेंगळे,युवा नेते संजय कोळसे,पोपट रोकडे ,भिवनाथ पवार ,रावसाहेब आघाव,भाऊराव काळे आदि उपस्थीत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत