राहुरी/वेबटीम:- राहुरी न्यायालयात आज शुक्रवार दिनांक २९ एप्रिल रोजी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी ...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी न्यायालयात आज शुक्रवार दिनांक २९ एप्रिल रोजी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.
या शिबिराच्या अध्यक्षस्थानी मुख्य दिवाणी न्यायाधीश श्रीमती असावरी वाडकर मॅडम होत्या तर प्रमुख उपस्थितीत सह.न्यायाधीश सौ.सुजाता शिंदे मॅडम, सह.न्यायाधीश कु.माया मथुरे मॅडम या होत्या.
प्रसंगी मोफत आणि सक्तीचे शिक्षण या विषयी माहिती ॲड.प्रकाश संसारे यांनी दिली तर बालविवाह कायद्या संदर्भात माहिती ॲड.अजय पगारे यांनी दिली.
यावेळी बोलताना श्रीमती असावारी मॅडम म्हणाल्या की, न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश यांनी शिक्षणाबाबत कोणीही वंचित राहणार नाहीत याबाबत आपण सर्वांनी काळजी घ्यावी तसेच बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करावेत.
येत्या दिनाक ०७/०५/२०२२ रोजी होणाऱ्या लोकन्यायालयात जास्तीत जास्त प्रकरण ठेवण्याचे आव्हान करून प्रकरण निकाली काढण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती केली.
यावेळी राहुरी तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.राहुल शेटे,ॲड.भानुदास नवले, ॲड.भगवान उर्हे,ॲड.अशिफ शेख, ॲड.सुरेखा कुलकर्णी,ॲड.ज्योती राऊत ॲड.तुषार ढवळे,ॲड.प्रफुल सगळगीळे,ॲड.संतोष साळुंके, ॲड.दिनकर तांबे,ॲड,सचिन कोळसे, लीगल विभागाचे विकास जाधव तसेच लाभ धारक पक्षकार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुरी तालुका बार असोसिएशनचे मा.उपाध्यक्ष ॲड. मच्छिंद्र देशमुख यांनी केले तर आभार सरकारी वकील रवींद्र गागरे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत