आंबी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील धार्मिकदृष्टीने नावलौकिक असलेल्या आंबी-अंमळनेर या दोन्ही गावचे ग्रामदैवत श्री अंबिकेश्वर व लक्ष्मी माता य...
आंबी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील धार्मिकदृष्टीने नावलौकिक असलेल्या आंबी-अंमळनेर या दोन्ही गावचे ग्रामदैवत श्री अंबिकेश्वर व लक्ष्मी माता यात्रोत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी गणेश केशव कोळसे तर उपाध्यक्षपदी दादासाहेब किसन साळुंके यांची नुकतीच निवड करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी चेअरमन भागवतराव कोळसे हे होते. या यात्रा कमेटीत विरेश कोळसे, संदीप कोळसे, अनिल साळुंके, डॉ. दत्तात्रय साळुंके, सर्जेराव डुकरे, अमोल जाधव, रविंद्र जाधव, डॉ. संदीप जाधव, ज्ञानदेव सालबंदे, डॉ. अजित सालबंदे, बापूराव कोळसे, गोरख लोंढे, प्रा. अशोक साळुंके, शंकरराव डुकरे, शिवाजी रोडे, गणेश रोडे, प्रशांत पाळंदे, रविंद्र पाळंदे, फरहान पठाण, रमेश फुलमाळी, संजय फुलमाळी, शौकद इनामदार, कृष्णा वायदंडे, यांसह आदिंचा समावेश करण्यात आला आहे.
अक्षयतृतीयेपासून तिन दिवस यात्रा भरणार असून त्या निमित्त ह.भ.प. दीपक महाराज आंबेजोगाई यांचे हरिकीर्तन, आर्केस्ट्रा, कुस्त्याचा जंगी हगामा यांसहसह आदि भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पंचकोशितील अबालवृद्ध नागरीकांनी या यात्रा उत्सवात सहभागी होऊन आपला आनंद द्विगुणीत करावा असे अवाहन यात्रा कमेटीसह सरपंच, उपसरपंच सर्व सदस्यासह समस्त आंबी-अंमळनेर ग्रामस्थांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत