कोपरगाव प्रतिनिधी :- समाजाची गरज ओळखून लायन्स, लीनेस व लिओ क्लब राबवीत असलेले सर्व उपक्रम कोतुकास्पद आहेत. बिझनेस एक्स्पोच्या माध्यमातून क...
कोपरगाव प्रतिनिधी :-
समाजाची गरज ओळखून लायन्स, लीनेस व लिओ क्लब राबवीत असलेले सर्व उपक्रम कोतुकास्पद आहेत. बिझनेस एक्स्पोच्या माध्यमातून कोपरगावची बाजारपेठ फुलण्यासाठी मोठी मदत मिळणार असून आजपर्यंत केलेल्या सहकार्याची परंपरा यापुढेही सुरूच राहील व भविष्यात देखील लायन्स, लीनेस व लिओ क्लबच्या सामाजिक उपक्रमांना सर्वोतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली.
लायन्स, लिनेस व लिओ क्लब ऑफ कोपरगाव यांच्या वतीने महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना प्रायोजित 'एक्स्पो २०२२' चे उदघाटन ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, कोपरगावची बाजारपेठ फुलविण्यासाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या माध्यामतून गोदाकाठ महोत्सव देखील महत्वाची भूमिका पार पाडत आहे. त्याप्रमाणे लायन्स, लिनेस व लिओ क्लब ऑफ कोपरगाव लोकांची गरज ओळखून ‘बिझनेस एक्स्पो’च्या माध्यमातून आपले कर्तव्य बजावत आहे हि अभिमानाची गोष्ट आहे. मागील दोन वर्षात माझ्यावर दाखविलेल्या विश्वासातून कोपरगावकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी १३१ कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर झाली आहे. निविदा देखील प्रसिद्ध झाली आहे. वर्षभरात पाणी प्रश्न सोडविण्याचा माझा प्रयत्न आहे. प्रमुख रस्त्यांची कामे पूर्ण होत आली असून अनेक रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. कोपरगाव शहराच्या विकासासाठी १८ कोटी निधी कोपरगाव नगरपरिषदेला दिला आहे. कोपरगाव शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या आय.टी. आय, इमारतीचे सात कोटीचे काम पूर्ण होवून येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी नवीन इमारतीतच प्रशिक्षण घेवू शकणार आहे. अशी विविध कामे मागील दोन वर्षात पूर्ण केली आहेत. यापुढील काळात देखील सर्वांच्या सहकार्यातून विविध विकासकामे पूर्ण करून सर्वांच्या मदतीने कोपरगावचे गेलेले वैभव पुन्हा मिळवायचे असल्याचे ना. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे, सकाळचे निवासी संपादक प्रकाश पाटील, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, मालपाणी उद्योग समूहाचे संचालक राजेश मालपाणी, प्रभात उद्योग समूहाचे किशोर निर्मळ, सह्याद्री फार्मस् नाशिकचे विलास शिंदे, कापसे पैठणीचे बाळासाहेब कापसे, लिनेस क्लब, ऑल इंडिया मल्टिपल चतुर्भुजच्या अध्यक्षा डॉ. वर्षा झवर, लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे अध्यक्ष राम थोरे, सेक्रेटरी अक्षय गिरमे, खजिनदार सुमित भट्टड, लिनेस क्लब ऑफ कोपरगावच्या अध्यक्षा भावना गवांदे, सेक्रेटरी अंजली थोरे, खजिनदार डॉ. अस्मिता लाडे, लिओ क्लब ऑफ कोपरगावचे अध्यक्ष आदित्य गुजराथी, सेक्रेटरी पृथ्वी शिंदे, खजिनदार ध्रुव शिंदे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, हाजी मेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, कृष्णा आढाव, दिनकर खरे, अॅड. विद्यासागर शिंदे, डॉ. तुषार गलांडे, चंद्रशेखर म्हस्के, प्रकाश दुशिंग, राजेंद्र खैरनार, वाल्मिक लहिरे, संदीप कपिले, आकाश डागा, रामदास केकाण, विशाल जगताप, प्रा.अंबादास वडांगळे, नितीन शिंदे, अॅड.मनोज कडू, नारायण लांडगे, मनोज नरोडे, जनार्दन शिंदे, विकी जोशी, जय बोरा आदींसह लायन्स, लिनेस व लिओ क्लब ऑफ कोपरगावचे सर्व सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत