कोपरगाव/वेबटीम:- महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड संस्थेकडून दिले जाणारे राज्यस्तरीय पुरस्कार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते म...
कोपरगाव/वेबटीम:-
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड संस्थेकडून दिले जाणारे राज्यस्तरीय पुरस्कार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईत प्रदान करण्यात आले. सन 2018-19 व 20 19-2020 साली घेतलेल्या परीक्षेत राज्य भरातून आलेल्या 144 स्काऊट गाईडसना प्रातिनिधिक स्वरूपात पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात अहमदनगर जिल्यातून कोपरगाव तालुक्यातुन प्रथमच सेवनिकेत कॉन्व्हेंट स्कूल मधील विद्यार्थी अथर्व संजय भवर याने जिल्ह्याचे प्रतिनित्व केले. सन २०१८-१९ मध्ये दिलेल्या परीक्षेसाठी त्याला राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला क्रीडामंत्री सुनील केदार , क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्य मुख्य आयुक्त क्रीडा व युवक सेवा व संचनालंय ओमप्रकाश बकोरिया उपस्थित होते . स्काऊट गाईड अभ्यास क्रमात हा पुरस्कार सर्वोच्च मानला जातो. अभ्यासक्रमाचे प्रवेश पहिला दुसरा आणि तिसरा टप्पा पूर्ण केल्यानंतर राज्य पुरस्कार या वर्गात प्रवेश घेता येतो. 2018 ते 2020 या काळात राज्यात सात हजार 592 जणांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला. मात्र कोरोनामुळे या कालावधीत पुरस्कार समारंभ होऊ शकला नव्हता तो दिनांक 26एप्रिल 2022 देण्यात आला.
त्यावेळी बोलताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले, स्काऊट गाईडमध्ये काम करताना प्रमाणपत्र अथवा पुरस्काराची आशा न बाळगता समाजसेवा करावी. समाजसेवा केल्यानंतरचे जे आशीर्वाद मिळतात ते पुरस्कारापेक्षा खूप महत्त्वाचे असतात. या पुरस्काराने सर्वांना प्रोत्साहन मिळेल. आज तुम्ही राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला, यापेक्षा अधिक चांगले काम केल्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकाराल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रार्थना न करता प्रार्थनेमधील अर्थांची स्वतःच्या जीवनात अंमलबजावणी करा. काम करताना ते मनापासून उत्तम करण्याचा प्रयत्न करा. महाराष्ट्र राज्य हे स्काऊट गाईडच्या माध्यमातून समाजसेवक घडविण्यात देशात प्रथम स्थानी आहे. सामजिक जाण, सहकार्य, शांती, अहिंसा व सत्य हे गुण अखंडपणे जोपासणे गरजेचे आहे. त्यासाठी स्काऊट गाईडने आजवर योगदान दिले आहे. राज्यात अतिदुर्गम भाग असलेल्या ठिकाणी या चळवळीतून मुलांवर खूप चांगले संस्कार घडविले जाऊ शकतात असे त्यांनी सांगितले. यानिमित्ताने आपल्या शालेय जीवनातील स्काऊट गाईडच्या आठवणींना उजाळा देत राज्यपाल यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. पुरस्कार सोहळ्याचे प्रास्ताविक क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केले. महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईडचे राज्य सरचिटणीस एन.बी. मोते यांनी आभार व्यक्त केले
अथर्व हा छायाचित्रकार संजय भवर यांचा मुलगा आहे. स्काऊट मास्टर ज्ञानदेव घोरपडे सर यांचे त्यास मोलाचे मार्गदर्शन लाभले. मा नामदार राज्यमंत्री आशुतोष काळे तसेच सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूलच्या मॅनेजर सिस्टर झेलमा परेरा , प्राचार्या सिस्टर जोयलेट परेरा यांनी अथर्वचे अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत