मंत्री गडाख समर्थकांचा मुळाथडी परीसरात कडकडीत बंद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मंत्री गडाख समर्थकांचा मुळाथडी परीसरात कडकडीत बंद

पानेगांव/वेबटीम:- राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख पाटील यांचे स्विय सह्हायक राहुल राजळे गोळीबार झाल्यानंतर पुन्हा तीन दिवसांत म...

पानेगांव/वेबटीम:-


राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख पाटील यांचे स्विय सह्हायक राहुल राजळे गोळीबार झाल्यानंतर पुन्हा तीन दिवसांत मंत्री गडाख व पुत्र उदयन यांना जिवे ठार मारण्याचा कट रचला आहे असा असायची आॅडियो क्लिप व्हायरल झाल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.



असला घाणरेडा राजकारणाचा निषेध करण्यासाठी दि.२७ रोजी सकाळी ८वाजल्यापासून मुळाथडी परीसरातील  पानेगांव,करजगांव,अंमळनेर,निंभारी,वाटापूर,तामसवाडी,शिरेगांव, खेडलेपरमानंद, बेल्हेकरवाडी, गणेशवाडी, आदी गावांत कडकडीत बंद पाळून जाहिर निषेध व्यक्त करुन तात्काळ सर्व आरोपी जेरबंद करण्यात यावे.तसेच भविष्यात असा अपप्रवृत्ती वेळीच ठेसून काढण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.ठिक ठिकाणी चौक सभा होवून यावेळी निषेधाच्या घोषणा देवून नामदार शंकरराव गडाख पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. वातावरण दणाणून गेले होते.

यावेळी पानेगांवचे लोकनियुक्त सरपंच संजय जंगले, उपसरपंच रामराजे जंगले, सतिश जंगले,मुळाचे संचालक रंगनाथ जंगले, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय घोलप,पानेगांव संस्थेचे अध्यक्ष जालिंदर जंगले, बबनराव जंगले,कै पोपटराव संस्थेचे उपाध्यक्ष रमेश गुडधे, हितेश जंगले, करजगावचे आशुतोष माकोणे, चंद्रकांत टेमक, संजय कंक, संदिप पुंड, सतिश फुलसौंदर,ठकाजी बाचकर, अंमळनेर सरपंच अच्युतराव घावटे, एकनाथ पवार, गंगाधर पवार,अण्णासाहेब कंक, निंभारीचे कैलास जाधव, बाबासाहेब पवार, चंद्रकांत जाधव, वाटापुरचे अॅड पांडुरंग माकोणे कर्णासाहेब औटी,भिकाजी जगताप, कैलास सुकाळकर,तामसवाडीचे देविदास जगताप लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत जगताप, शिरेगांचे परमानंद जाधव,किरण जाधव, संदिप जाधव, दिगंबर जाधव, शिवनाथ तुवर खेडलेपरमानंद मुळाचे अध्यक्ष नानासाहेब तुवर,सरपंच मेजर राजळे, अल्लूभाई इनामदार, बेल्हेकरवाडीचे सरपंच दत्तात्रय बेल्हेकर, 

आदी सह मोठ्या संख्येने ग्रामस्थांन बरोबरच युवकांनी बंद मध्ये सहभागी झाले होते.सोनई पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आदीनाथ मुळे, सतिश कुह्राडे चोख बंदोबस्त बजावला.

 नामदार शंकरराव गडाख पाटील व युवा नेते उदयन गडाख यांचा हल्ला बाबत क्लिप जाहिर निषेध व्यक्त करुन आरोपींना तातडीने अटक करुन घटनेमागचे मुख्य सुत्रधार शोधून काढा-संजय जंगले-  लोकनियुक्त सरपंच पानेगांव.

सुसंस्कृत राजकारणाला जिल्ह्याला दिशा देणारे शेतकऱ्यांचा प्रश्नांनसाठी दिवसरात्र काम करणारे राज्याचे सत्ताधारी तसेच विरोधक आमदार मंत्री नामदार गडाख यांच्या कामाचे कौतुक करत आहे हे तालुक्यातील काही विरोधकांना पोटशूळ उठत असल्याने एवढ्या खालच्या धराला जावून राजकारण करत असून आम्ही जाहिर निषेध करतो तामसवाडी लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत जगताप,- विठाई संस्थेचे अध्यक्ष- परमानंद जाधव

 

मागील तीन दिवसांपूर्वी नामदार शंकरराव गडाख पाटील,उदयन दादा यांचा हल्ला आॅडियो क्लिप महिला भगिनींच्या वतीने जाहिर निषेध करुन तातडीने आरोपींना जेरबंद करण्यात यावे शिवसेना महिला आघाडीच्यानेत्या- दिपाली नवगिरे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत