देवळाली प्रवरा(वेबटीम):- देवळाली प्रवरा शहरातील बाजारतळ येथे दंगल झाल्याची घटना घडली....पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल...
देवळाली प्रवरा(वेबटीम):-
देवळाली प्रवरा शहरातील बाजारतळ येथे दंगल झाल्याची घटना घडली....पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली . काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.मात्र हे सर्व पोलिसांच्या दंगल काबू पथकाची रंगीत तालीम सुरू आल्याचे समजताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राहुरी पोलिसांच्यावतीने पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारतळ येथे आज दंगा काबू योजनेचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी हजर होते.
अनावधानाने काही अनुचित प्रकार आणि आपत्कालीन घटना घडल्यास सदर प्रकार हाताळण्यासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि राहुरी तालुका पोलीस सज्ज होते. यावेळी तहसीलदार एफ.आर.शेख हेही उपस्थित होते.
आपत्कालीन दुर्घटना घडली तर जमलेल्या गर्दीला कसं पांगवायच यासंदर्भात सराव करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत