उंबरे सोसायटी चेअरमन पदाची माळ कुणाच्या गळ्यात ? राज्यमंत्री तनपुरेंचे लक्ष ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

उंबरे सोसायटी चेअरमन पदाची माळ कुणाच्या गळ्यात ? राज्यमंत्री तनपुरेंचे लक्ष !

 राहुरी : वेबटीम     उंबरे सोसायटीच्या अटीतटीच्या निवडणुकीत गणराज शेतकरी मंडळाला 8, तर आदिनाथ सेवा मंडळाला 5 जागा मिळाल्या.उद्या चेअरमन, व्ह...

 राहुरी : वेबटीम    


उंबरे सोसायटीच्या अटीतटीच्या निवडणुकीत गणराज शेतकरी मंडळाला 8, तर आदिनाथ सेवा मंडळाला 5 जागा मिळाल्या.उद्या चेअरमन, व्हा. चेअरमनची निवड होणार आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे गणराज मंडळाचा चेअरमन होणार, की एैनवेळी तनपुरे कारखान्याचे चेअरमन जादूची कांडी फिरवून  सत्ता ताब्यात घेणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

राहुरी तालुक्यात राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या उंबरे सोसायटीची निवडणूक चुरशीची झाली. सत्ताधारी गटाचे नेतृत्व तनपुरे कारखान्याचे चेअरमन नामदेव ढोकणे यांनी केले.  कारखान्याचे माजी संचालक युवानेते सुनील आडसुरे यांनी प्रचाराची सर्व धुरा सांभाळली.  तर विरोधी गटातून तनपुरे कारखान्याचे माजी संचालक साहेबराव दुशिंग, नवनाथ पाटील ढोकणे, कारभारी ढोकणे,इंजि गोरक्षनाथ दुशिंग, बाबासाहेब ढोकणे आदींनी गणराज मंडळाचे नेतृत्व केले. या निवडणुकीत गणराज मंडळाने 8 जागांवर विजय मिळवत सत्ता खेचून आणली. तर, मावळत्या सत्ताधारी मंडळाला 5 जागांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे यामध्ये, राज्यमंत्री तनपुरे यांचे समर्थक सुनील अडसुरे यांचेच पाच संचालक जनतेने निवडणूक दिले आहेत. 
दरम्यान, दोन दिवसात चेअरमनची निवड होणार असल्याने गणराज शेतकरी मंडळ कुणाला संधी देणार याविषयी काही नावे पुढे येत आहेत. या मंडळात सर्व तरूण आणि नवे, सुशिक्षीत चेहरे आहेत. त्यामुळे त्यांच्यात मतभेद निर्माण होतील किंवा सत्तेसाठी कुणी फुटेल, असे चित्र सध्यातरी दिसत नाही. तर, विरोधी गटातून ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका पहायला मिळत आहे. जनतेचा कौल लक्षात घेता या निवडीत फोडाफोडीचे राजकारण होणार नाही, असे चित्र आहे. मात्र, तनपुरे कारखान्याचे चेअरमन ढोकणे यांची भूमिका महत्वाची आहे. त्यांनी जादुची कांडी फिरवली, तर कोण गळाला लागणार, याविषयीही चर्चा सुरू आहे. परंतु, सोसायटीवर विखे गटाचे वर्चस्व येणार असेल, तर तालुक्याच्या राजकारणात राज्यमंत्री तनपुरे हे नक्कीच स्थानिक आपल्याच गटाला मदत करणार आहेत. त्यामुळे सध्यातरी असे काही चित्र दिसत नाही. तरीही राजकारणात काहीही होऊ शकते, या उक्तीप्रमाणे गावकर्‍यांचे या चेअरमन निवडीकडे लक्ष आहे.
सध्या ज्येष्ठतेनुसार काही नावे आघाडीवर असून, प्रत्येकाला  चेअरमन पदाची संधी देण्याचा फार्म्यूला काढला जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे इतिहासात प्रथमच आठही जणांना चेअरमन आणि व्हा. चेअरमन पदाची संधी देणारी उंबरे सोसायटी प्रथम ठरणारी आहे.      दरम्यान, निवडणूक संपल्यानंतर दोन्ही गट खेळीमेळीच्या वातावरणात एकत्र आल्याचे दिसले, विशेष म्हणजे या दोन्ही गटात मंत्री तनपुरे यांचेच समर्थक असल्याने सर्व 13 संचालक हे तनपुरे गटाचेच आहेत, त्यामुळे आगामी निवडणुकीत हे सर्व नेते ( विखे गट सोडून) एकत्र दिसल्यास नवल वाटणार नाही. त्यामुळे विखे गटाला नाहक संधी देण्यापेक्षा राज्यमंत्री गावातील दोन्ही गटाचा रिमोट हातात घेऊन सत्तेचे समान विकेंद्रीकरण करू शकतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत