कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरातील नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ...
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी निवडून आल्यापासून शहर विकासावर लक्ष केंद्रित करून प्रतिकूल परिस्थितीत देखील कोपरगाव शहराला कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. हा निधी देण्याचा ओघ सातत्याने सुरु असून पुन्हा एकदा कोपरगावच्या रस्त्यासाठी महाविकास आघाडी सरकारने ५ कोटी निधी दिला असल्याची माहिती ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
खराब रस्त्यांमुळे कोपरगाव शहर नेहमी चर्चेत होते त्यामुळे उपहासात्मकपणे रस्त्यांच्या बाबतीत अनेक उपाध्या कोपरगाव शहराला मिळाल्या होत्या. अशा परिस्थितीत ना.आशुतोष काळे यांच्यापुढे कोपरगाव शहराच्या विकासाचे मोठे आवाहन होते. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या वजनाचा योग्य वापर करून विकासाच्या बाबतीत मागे असलेल्या कोपरगाव शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी ना. आशुतोष काळे यांनी मतदार संघासाठी अडीच वर्षात एक हजार कोटी निधी खेचून आणला असून यामध्ये कोपरगाव शहर देखील अपवाद नाही. कोपरगाव शहराला निधी मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न आणि त्यांची धडपड नेहमीच सुरुच असते. त्याच प्रयत्नातून महाविकास आघाडी सरकारने कोपरगाव शहरातील रस्त्यांसाठी ‘विशेष रस्ता अनुदान’ म्हणून ४ कोटी ६५ लाख व वैशिष्ठ्यपूर्ण योजने अंतर्गत ३५ लाख असा एकूण ५ कोटी रुपये निधी कोपरगाव शहरातील रस्त्यांसाठी दिला आहे. मागील काही वर्षापासून कोपरगाव शहरातील रस्ते हि सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी समस्या झाली होती. विशेषत: ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना याचा विशेष त्रास सहन करावा लागत होता. याची दखल घेवून ना. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराच्या रस्त्यांसाठी निधी मिळावा यासाठी दाखल केलेल्या प्रस्तावांची महाविकास आघाडी सरकारने दखल घेवून ५ कोटी रुपये निधी दिला आहे.
या निधीतून प्रभाग क्र.१ समतानगर गायकवाड घर ते पाटोळे घर रस्ता डांबरीकरण करणे (१२ लाख), प्रभाग क्र.३ सचिन महाराज घर ते आर.के.इंजिनिअरिंगपर्यंत रस्ता कॉंक्रीटीकरण (१० लाख), प्रभाग क्र.३ हिराबाई लाड घर ते शिंदे घरापर्यंत रस्ता कॉंक्रीटीकरण (१० लाख), प्रभाग क्र.४ वडांगळे वस्ती ते शेखर रहाणे वस्ती रस्ता डांबरीकरण (१२ लाख), प्रभाग क्र.४ जाकीरभाई घर ते अमोल शर्मा घर डी.पी.रस्ता डांबरीकरण (१२ लाख), प्रभाग, क्र.४ बोरावके वस्ती ते आढाव वस्ती रस्ता डांबरीकरण (१५ लाख), प्रभाग क्र.६ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते तहसील कार्यालय बँक रोड डांबरीकरण (३० लाख), प्रभाग क्र.६ ढमाले घर ते अरशी कॉम्प्लेक्स रस्ता कॉंक्रीटीकरण (२० लाख), प्रभाग क्र.६ देवरे घर ते भुसारी घर साईड पट्टीस लादीकरण करणे, प्रभाग क्र.६ संघवी घर ते माळी बोर्डिंग लादीकरण करणे, प्रभाग क्र.६ टिळकनगर शॉपिंग कॉम्प्लेक्स शेजारील परिसर सुशोभिकरण करणे, प्रभाग क्र.६ जिओ ऑफिस ते संदीप किराणा लादीकरण करणे (२४ लाख), प्रभाग क्र. ८ बाळासाहेब संधान घर ते पठाण घर रस्ता कॉंक्रीटीकरण (२५ लाख), प्रभाग क्र.८ कुरेशी ग्रुप बोर्ड ते चव्हाण घर रस्ता कॉंक्रीटीकरण (३० लाख), प्रभाग क्र.८ कडोसे घर ते संदीप पगारे घर रस्ता कॉंक्रीटीकरण (२० लाख), प्रभाग क्र.९ धारणगाव रोड श्रद्धा टॉवर्स ते सेवा निकेतन रोड पर्यंत रस्ता डांबरीकरण (३० लाख), प्रभाग क्र.९ लक्ष्मीनगर भागात अंतर्गत विविध गल्ल्यांमध्ये लादीकरण (३० लाख), प्रभाग क्र.९ इंदिरापथ रोड वरील झवेरी हॉस्पिटल ते डॉ.नरोडे घरापर्यंत रस्ता डांबरीकरण (२० लाख), प्रभाग क्रमांक ११ अंबिका मेडिकल ते दत्त मदिर रस्ता कॉंक्रीटीकरण करणे (२५ लाख), प्रभाग क्र.११ घेगडमल घर ते गायकवाड घर लादीकरण व पुंडे घर ते वैष्णोदेवी मंदिर पेव्हिंग ब्लॉक बसविणे (१० लाख), प्रभाग क्र.१२ बबलू दुकळे घर ते जुबेदा आप्पा घर रस्ता कॉंक्रीटीकरण व प्रभाग क्र.१२ दिपक घाटे घर ते फौजिया घर ते मिटकर घर रस्ता कॉंक्रीटीकरण, प्रभाग क्र.१२ तायरा आप्पा घर ते मोहमद शेख घर ते शरीफ शेख घर रस्ता कॉंक्रीटीकरण (१५ लाख), प्रभाग क्र.१४ पाखले घर ते पंढोरे वस्ती रस्ता डांबरीकरण (३० लाख), प्रभाग क्र.१४ गोदावरी नदीवरील छोटा पूल ते बेट डांबरीकरण (३५ लाख), द्वारकानगरी काका कोयटे यांचे घरासमोर सुतार लोहार कार्यालयापासून ते शंकरनगर मध्ये लोहार सर यांचे घरापर्यंत रस्ता डांबरीकरण (२० लाख), गवारे नगर तारांगण शॉप ते यमुना बिल्डींग ते सिनगर बिल्डींग ते साई यमुना बिल्डींग कॉर्नर ते रॉयल ड्रेम्म सिटी रस्ता डांबरीकरण (२० लाख), गवारे नगर अनवर शेख घर ते कटारे घर रस्ता डांबरीकरण (१० लाख),प्रभाग क्रमांक ९ श्रद्धानगरी परिसरातील सर्वे नं. १५५ उद्यान विकसित करणे (२५ लाख) व प्रभाग क्रमांक १० आचारी हॉस्पिटल जवळीक चौक सुशोभिकरण करणे (१० लाख) आदी विकास कामे या ५ कोटी निधीतून होणार आहे अशी माहिती ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत