वळण/वेबटीम:- शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा अशी शिकवण देणारे ज्ञानाचे महासागर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न आपल्याला पुर्ण करायचे अ...
वळण/वेबटीम:-
शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा अशी शिकवण देणारे ज्ञानाचे महासागर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न आपल्याला पुर्ण करायचे असेल तर आज समाजामधे छोट्या-छोट्या गोष्टींवरून सुरू असलेले धार्मिकतेचे वाद आपणास संपुष्टात आणावे लागतील आणि त्यासाठी वाचन असणे खुप महत्वाचे आहे. त्यामुळे या माहमानावांचे विचार डोक्यात घेण्यासाठी आपण सुरू केलेल्या अभ्यासिकाला आमच्याकडुन १३१ पुस्तके देण्याची ग्वाही राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांनी दिली आहे.ते वळण येथे बोलत होते.
वळण (ता.राहुरी) येथील आंबेडकर चौकात तसेच ग्रामपंचायत कार्यालयात, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, श्री.संत गाडगे महाराज आश्रम शाळेत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. आंबेडकर चौकात राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी दराडे म्हणाले की, ज्ञानाचा महासागर व दृरदृष्टी असणा-या महामानवाच्या जयंती निमित्ताने सर्व समाज बांधवाने गुण्यागोविंदाने नांदावे व तरूण पिडीने वाचनाकडे भर द्यावा आजच्या दिवशी आपण सुरू करत असलेल्या वाचनालयाच्या निर्णयाचे त्यांनी समाधान व्यक्त केले.
प्रसंगी राहुरी पोलीस ठाण्याचे अजिनाथ पाखरे, अशोक शिंदे, दादासाहेब रोहखरे,जालिंदर साखरे, सरपंच सुरेश मककारे, उपसरपंच लिलाबाई गोसावी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष एकनाथ खुळे, आशाबाई खुळे, बाजार समितीचे संचालक दत्तात्रय खुळे, शिवसेना तालुका उपप्रमुख सचिन म्हसे, अशोक कुलट, ज्ञानेश्वर खुळे, संजय शेळके, बाबासाहेब शिंदे, बाबासाहेब खुळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोविंद फुणगे, पञकार प्रभाकर मकासरे, वसंत आढाव, शरद खिलारी, रोहिदास रंधे, युवा सेनेचे तालुका उपप्रमुख धनंजय आढाव, रोहिदास आढाव, डाॅ.विजय मकासरे, राजू मकासरे, भाऊसाहेब खिलारी, आण्णा कार्ले, ग्रामसेवक संतोष राठोड, पोलीस पाटील सोमनाथ डमाळे, सिताराम गोसावी, काशिनाथ खुळे, मोबिन शेख, विजय आढाव,फकीरचंद फुणगे, हरीभाऊ डमाळे, उमेश खिलारी, दगडू साळवे, देवानंद मकासरे,सोना मकासरे,संदिप मकासरे,अमोल मकासरे, शुभम मकासरे, बळीराम दरंदले, विजय बनकर, एकनाथ कर्डिले, मुख्याध्यापक मंगेश पगारे, मच्छिंद्र गायकर, हनुमंत चौधरी यांच्यासह शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी ग्रामस्थ युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत