देवळाली प्रवरा/वेबटीम:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर तत्वज्ञ होते, ते राज्यशास्त्र अभ्यासक, अर्थशास्त्रज्ञ व थोर विचारवंत होते त...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर तत्वज्ञ होते, ते राज्यशास्त्र अभ्यासक, अर्थशास्त्रज्ञ व थोर विचारवंत होते त्यांनी जगातील सर्वात मोठी राज्यघटना आपल्या देशाला देवून लोकशाही कशी असावी याची फार मोठी देणगी आपल्या भारत देशाला दिली आहे आज त्या महापुरुषाची आपण 131 वी जयंती साजरी करत असतांना त्यांच्या सर्वसमावेशक विचारांची शिदोरी आजच्या समाजासमोर मांडली तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्व समाजांचे होते त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला राज्यघटनेद्वारे न्याय व स्वातंत्र्य दिले आहे, त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचे होते हे सांगणे हे कुणाला सांगण्याची गरज नाही, महाराष्ट्र हे थोर विचारवंतांचा, महापुरुषांचा व संतांचा वारसा असलेले राज्य आहे परंतु हल्लीच्या काळात थोर महापुरुषांना, विचारवंतांना व संतांना एका जाती धर्माच्या चौकटीत अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे, सर्व जाती धर्माच्या समाजाने हे महापुरुष वाटून घेण्याऐवजी या सर्व थोर महापुरुषांविषयी सद्भावणा ठेवून सन्मान दिला तर आजची समाजा-समाजातील दरी दूर होण्यास वेळ लागणार नाही व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वाचे होते, त्यांचे विचार कुण्या एका जातीधर्माच्या चौकटीत अडकविण्यासारखे नाही, त्यांचे कार्य महान आहे अशा थोर महापुरुषांना जाती धर्मांच्या चौकटीत अडकवू नका असे प्रतिपादन मा. आ. चंद्रशेखर कदम पाटील यांनी यावेळी केले.
सुरुवातीला उपस्थित सर्वच मान्यवरांच्या आणि नागरिकांच्या हस्ते महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना कदम म्हणाले की, राजवाडा प्रतिष्ठान च्या सुशिक्षित तरुणांच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छोटेखानी व अतिशय देखणी जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आज जेव्हा मी इथे आलो तेव्हा मला राजवाडा येथील सुधारलेला स्तर व राहणीमान बघून मला राजवाड्यात आल्यासारखे वाटले नाही. माझे या तरुण पिढीला जयंतीच्या निमित्तानं एकच सांगले राहिल की, आपले भवितव्य यशस्वी करण्यासाठी आपण प्राधान्याने प्रथम आपल्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे, तरच बाबासाहेबांचे विचार सार्थ ठरतील.
यावेळी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी अभिवादनपर बोलतांना असे म्हणाले की, आजच्या काळात समाजा-समाजामध्ये तेढ कशी निर्माण करता येईल याचे कारस्थान बर्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे, ती तेढ संपुष्टात आणण्यासाठी सामाजिक एकोपा निर्माण होणे ही काळाची गरज बनली आहे. या जयंतीच्या निमित्ताने राजवाडा प्रतिष्ठानच्या तरुण कार्यकर्त्यांचे कौतुक केले पाहिजे कारण त्यांनी ज्यावेळी जयंती ची संकल्पना माझ्या समोर मांडली त्यावेळी ते म्हणाले की, डी. जे. लावून नाचायचे नसून आम्हाला जयंती शांततेत साजरी करायची आहे व तरुण पिढीसमोर बाबासाहेबांचे विचार मान्यवरांच्या माध्यमातून मांडायचे आहेत, मी त्यांना आमझ्या मनातील कल्पना सुचवली की, बाबासाहेबांनी जो शिक्षणाचा संदेश आपल्याला दिला आहे त्यासाठी आपण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्या कुटुंबातील मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना शिक्षणात मदत होईल असे कार्य या जयंतीच्या निमित्ताने केले पाहिजे तर राजवाडा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी याला दुजोरा दिला व बाबासाहेबांच्या 131 व्या जयंतीच्या निमित्ताने येत्या शैक्षणिक वर्षापासून 131 मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या संपूर्ण शालेय शिक्षणाची जबाबदारी राजवाडा प्रतिष्ठान व सत्यजित कदम फाउंडेशन च्या माध्यमातून घेतली जाईल असे त्यांनी यावेळी संगितले.
यावेळी पुढे बोलताना सत्यजित कदम म्हणाले की, नगराध्यक्ष म्हणून गेली पाच वर्षे काम करत असतांना राजवाड्यातील प्रलंबित कामांचे प्रश्न घेवून राजवाडा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते माझ्याकडे यायचे त्यांच्या माध्यमातून स्मशानभूमी विकसित करणे, स्वच्छता गृह, भूमिगत गटार, लाईट, पेव्हर ब्लॉक सारखे अनेक कामे आपल्या भागात झाली या तरुणांचा पाठपुरावा असा असायचा की, ही मुले समोरून दिसली की धाक पडायचा जो पर्यंत त्यांची कामे मार्गी लागणार नाहीत तो पर्यंत ते स्वस्थ बसत नव्हते, असे यावेळी सत्यजित कदम म्हणाले.
यावेळी नामदार शिवाजीराव ढवळे साहेब यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना आपल्या प्रसिद्ध शैलीत गडगंज श्रीमंत राजकारण्यांचा खरपूस समाचार घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलु उलगडून सांगताना, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजाप्रती असलेले अमूल्य योगदान विषद करताना महापुरुष समाजात वाटून घेण्याच्या प्रव्रृत्तीवर जोरदार टीका केली.
तहसिलदार फसियोद्दीन शेख म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांनी नेहमी समानतेचा पुरस्कार केला आहे. त्यामुळे सामाजिक ऐक्य प्रस्थापित होणे गरजेचे आहे. मध्यंतरीच्या काळात तालुक्यातील काही घटनांमुळे सामाजिक दरी अधोरेखित झाली. त्यामुळे आपण सर्वांनी अशा प्रकारे एकत्र येत समाजिक शांतता निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण सर्वांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणुकी नुसार आचरण करणे गरजेचे आहे.
यावेळी पोलिस निरीक्षक प्रतापराव दराडे म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संपुर्ण मानवजाती साठी कार्य केले आहे. त्यामुळे अखिल मानवजातीला या निमित्ताने शुभेच्छा देताना, मला वयक्तिक आयुष्यात देखील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श खूप कामी आला आहे.
यावेळी मुख्याधिकारी अजित निकत म्हणले की, राजवाडा प्रतिष्ठान च्या माध्यमातून साजरी केली जाणारी जयंती वाखाणण्याजोगी आहे. आपण सर्वांनी डॉ. आंबेडकर यांनी सांगितलेल्या मार्गावर चालणे आवश्यक आहे
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल संसारे यांनी केले आभार प्रदर्शन मा. उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजवाडा प्रतिष्ठानचे विशाल संसारे, अक्षय संसारे, ऋषिकेश पंडित, अमोल पंडित, आकाश कीर्तिकर, सनी अशोक पंडित, सनी संजय पंडित, अजय पंडित, विशाल संसारे, अनिल मकासरे, किशोर पंडित, प्रशांत संसारे, अनिकेत पंडित, संदीप संसारे आदींनी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत