वांबोरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.११ ते १...
वांबोरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.११ ते १४ एप्रिल दरम्यान विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आज सोमवारी महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ठवाळ, राजेंद्र तेलोरे, रमेश धनवटे, श्री.पटारे सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रारंभी प्रदीप भाऊ मकासरे यांनी सर्वांचे स्वागत केले.
यंदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पशुवैद्यकीय सरकारी दवाखान्यास डॉ.आंबेडकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली.
तयावेळी अतिश मकासरे , दीपक साखरे ,भरत भांबळ,अमोल मकासरे ,राहुल भांबळ ,संदीप भांबळ, प्रमोद मकासरे ,विशाल पटेकर ,सागर मकासरे, नितीन भांबळ ,रॉकी पवार ,कमलाकर भांबळ ,बॉबी भांबळ व भीम सैनिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत